MI vs CSK : चेन्नईकडून मुंबई इंडियन्सचा दारूण पराभव

एमपीसी न्यूज – : मुंबई इंडियन्सचा चेन्नईकडून मानहानीकारक पराभव झाला. हा पराभव मुंबईच्या चाहत्यांच्या नक्कीच जिव्हारी लागला असेल..(MI vs CSK) शनिवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडिअन्सना 6 बळी आणि 14 चेंडू राखून हरवले. चेन्नईने हा सामना जिंकून पॉईंट्स टेबल वर स्वतःला द्वितीय क्रमांकावर पोहोचवले आहे.  चेपॉकवर झालेल्या या सामन्यांमध्ये सीएसके ने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करायचा निर्णय घेतला.

पहिली फलंदाजी करताना मुंबईची वरच्या फळीतील फलंदाजी फ्लॉप झाली. कॅमरून ग्रीन (6 धावा), ईशान किशन ( 7 धावा) आणि कर्णधार रोहित शर्मा ( 0 धावा) यांचा लवकर बाद होण्याने मुंबईचे मोठी धावसंख्या उभी करण्याच्या लक्ष्याला मोठा तडा गेला. नेहल वढेरा याचा बहुमूल्य 51 चेंडूंमध्ये 64 धावा आणि सूर्यकुमार यादव 22 चेंडूंमध्ये 26 धावांनी मुंबई इंडिअन्सचा मान राखला असे आपण म्हणू शकतो. ट्रिस्टन स्टब्स याचा कॅमिओमुले मुंबई इंडियन्स 139 धावांचे  सन्मानजनक लक्ष चेन्नई सुपर किंग्स समोर ठेवले. चेन्नईकडून उत्कृष्ट गोलंदाजी करताना मथीषा पाठीराना याने 3 बळी घेतले तर दीपक चाहर आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. रवींद्र जडेजानेही 1 बळी घेतला.

Manipur violence : मणिपूरमध्ये अडकलेल्या मराठी विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी विशेष विमानाची सोय

140 धावांचा पाठलाग करताना चेन्नईच्या सलामीवीरांनी सुरुवात उत्तम केली. पुण्याचा हिरो ऋतुराज गायकवाड याने 16 चेंडूंमध्ये 30 धावा काढल्या तर या आयपीएलमध्ये सुसंगत खेळी करणारा देवान कॉन्वे याने 42 चेंडूंमध्ये 44 धावा काढल्या. अजिंक्य राहणे यानेही चांगली कामगिरी कायम ठेवत (MI vs CSK) 17 चेंडूंमध्ये 21 धावांचे योगदान दिले. इम्पॅक्ट प्लेअर अंबाती रायुडू( 12 धावा), शिवम दुबे (26 धावा) आणि कर्णधार एम एस धोनी (2 धावा) यांचा योगदानामुळे सीएसकेने लक्ष ना घाम फुटता साध्य केले. मुंबईकडून पियुष चावला याने 2 बळी घेतले तर ट्रिस्टन स्टब्स आणि आकाश मधवाल यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

चेन्नईने सलग 2 पराभवानंतर हा गरजेचा असलेला विजय मिळवला. (MI vs CSK) परंतु मुंबईची कामगिरी या सामन्यात निराशाजनक होती. रोहितने आयपीएलच्या इतिहासात 16 वेळा खाते न उघडता बाद होण्याचा विक्रम कायम ठेवला . मुंबईचा स्टार गोलंदाज जॉफ्रा आर्चर हा सुद्धा काल गोलंदाजी करताना अस्वस्थ दिसत होता. त्याची दुखापत मुंबईसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.