IPL 2023 : हाय स्कोरिंग सामन्यात मुंबई इंडियन्स विजयी

एमपीसी न्यूज :  बुधवारी झालेल्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने (IPL 2023) पंजाब किंग्सना 6 बळी आणि 7 चेंडू राखून हरवले. पंजाबने समोर मांडलेले विशाल लक्ष मुंबईने तसे बघायला गेले तर सहजच पार पाडले. मोहालीच्या पीसीए मैदानावर दुसरी फलंदाजी करणाऱ्या संघाला लक्षचा पाठलाग करणे अवघड जाऊ शकते हे आपण बघत आलेलो आहोत. तरीही धीटपणा दाखवत मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करायचा निर्णय घेतला.

पहिली फलंदाजी करताना सलामीवीर प्राभसिमरन सिंग (9 धावा) लगेच बाद झाला. परंतु त्याचा जोडीदार, कर्णधार शिखर धवन (30 धावा) आणि मॅट शॉर्ट (27 धावा) यांनी पंजाबची खेळी पुढे चालवली. इथे पर्यंत पंजाब तशी मंद गतीनेच पुढे जात होती. परंतु लियम लिविंगस्टोन याचा 42 चेंडूंमध्ये 82 आणि जितेश शर्माच्या 27 चेंडूंमध्ये 49 या खेळींमुळे पंजाब हे 214 या विशाल धावसंख्येपर्यंत पोहचू शकले. मुंबईकडून गोलंदाजी करताना फिरकी गोलंदाज पियुष चावला याने 2 बळी घेतले तर अर्शद खान याने 1 बळी घेतला.

२१५ या विशाल लक्षाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा (0 धावा) हा खाते न उघडताच बाद झाला. पण युवा फलंदाज ईशान किशन याने मात्र 41 चेंडूंमध्ये 75 धावा काढल्या. कॅमरून ग्रीन याने ही 18 चेंडूंमध्ये 23 धावा काढल्या. इम्पॅक्ट प्लेअर सूर्यावर यादवने 31 चेंडूंमध्ये 66 धावा काढल्या. टीम डेव्हिड (19 धावा) आणि तिलक वर्मा (26 धावा) या योगदानांमुळे मुंबई इंडियन्सने 19व्या षटकातच सामना जिंकला. पंजाबकडून नेथन एलिस याने 2 बळी घेतले (IPL 2023) तर ऋषी धवन आणि आर्षदिप सिंग यांनी प्रत्येकी 1 बळी घेतले.

Chinchwad : सनातनच्या वतीने चिंचवडमधील 4 शाळांना सनातनच्या ग्रंथांचे विनामूल्य वितरण

मुंबईने स्वतःचे 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत. ते आता प्ले ऑफला पात्र ठरण्यासाठी अजून सक्षम दिसत आहेत. पंजाबकडेही अजून संधी आहेच. आता आयपीएलला अजून जीव आला आहे म्हणू शकतो. प्ले ऑफची शर्यत ही आता अजून मजेशीर झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.