IPL 2023 : चेन्नईला हरवून राजस्थान रॉयल्स पहिल्या क्रमांकावर; चेन्नईच्या नेट रनरेटमध्ये घट

एमपीसी न्यूज – 27 एप्रिल 2023, गुरुवारी रोजी झालेल्या ( IPL 2023 ) सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्सला राजस्थान रॉयल्सने 32 धावांच्या मोठ्या फरकाने हरवले. चेन्नई हा सामना मोठ्या फरकाने हरल्यामुळे त्यांची लीग टेबलमध्ये प्रथम क्रमांकावरून थेट तृतीय क्रमांकावर गेलेली आहे. राजस्थान हा सामना जिंकून स्वतःच्या 8 पैकी आता 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे ते आता लीग टेबलवर प्रथम स्थानी आले आहेत. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून फलंदाजी करायचा निर्णय घेतला.

पहिली फलंदाजी करताना राजस्थान सुरुवात उत्कृष्ट झाली. सलामीवीर फलंदाज जॉस बुट्ट्लर आणि यशस्वी जैस्वाल यांनी तोफानी फलंदाजी करत 86 धावांची भागेदारी केली. बुट्ट्लरने 21 चेंडूंमध्ये 27 धावा काढल्या तर यशस्वी जैस्वाल याने 43 चेंडूंमध्ये 77 धावा काढल्या. कर्णधार संजू सॅमसन ( 17 धावा) आणि शिमरॉन हेटमायर (8 धावा) हे दीर्घकाळ टिकू शकले नाहीत. शेवटी ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिकल यांचा कॅमिओमुले राजस्थान रॉयल्स यांनी २०२ची विशाल धावसंख्या गाठली. चेन्नईकडून गोलंदाजी करताना तुषार देशपांडे याने 2 बळी घेतले. रवींद्र जडेजा आणि महिष तीक्षणा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

Pune : पुण्यात ‘एकावर एक फ्री’चं आमिष भोवलं, 400 रुपयांची थाळी पडली 2 लाखांना

203 या विशाल लक्षचा पाठलाग करताना चेन्नई सुरवातीलाच डगमगली. देवान कॉन्वे (8 धावा) आणि अजिंक्य राहणे (15 धावा) लवकरच बाद झाले. सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांनी तुफान खेळी केली. गायकवाडने 29 चेंडूंमध्ये 47 धावा काढल्या तर दुबेने 33 चेंडूंमध्ये 52 धावा काढल्या. इम्पॅक्ट प्लेअर रायुडू खाते न उघडता बाद झाला. मोईन अली (23 धावा) आणि रवींद्र जडेजा (23 धावा) यांचा  तुफानी खेळीने सुद्धा ते चेन्नईची नाव पार करू शकले नाहीत. सुरुवातीला झालेल्या शीत गतीच्या खेळीमुळे चेन्नई सामन्यावर नियंत्रणच मिळवू शकले नाहीत. राजस्थानकडून गोलंदाजी करताना ऍडम झम्पा याने 3 बळी घेतले तर रविचंद्रन अश्विन याने 2 बळी घेतले. इम्पॅक्ट प्लेअर वेगवान गोलंदाज कुलदीप यादव याने 1 बळी घेतला.

चेन्नईकडून काळ खराब गोलंदाजी व साकारात्मक हेतू नसणारी फलंदाजी दिसली. चेन्नईचे नेट रनरेट हे पडून आता थेट +0.376. राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2023 मध्ये झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये चेन्नईला हरवले आहे. संजू सॅमसन याचा नेतृत्व करण्याचा पद्धतीला धोनीला सुद्धा आश्चर्यचकित केले असेलच. राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स ( IPL 2023 ) आणि c यांनी आयपीएल 2023 मध्ये कामगिरी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.