IPL 2023 – रोमांचक लास्ट बॉल थ्रिलरमध्ये राजस्थान रॉयल्स विजयी; धोनीकडून विंटेज खेळी

एमपीसी न्यूज – गुरुवारी 12 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यामध्ये (IPL 2023) राजस्थानने चेन्नईला तीन धावांनी हरवले. सामना भरपूर रोमांचक प्रकारे झाला आणि शेवटच्या चेंडूवरती सामन्याचा निकाल लागला. चेन्नई सुपर किंग्स भलेही चेपॉकच्या घरेलू मैदानावर हरले असले तरीही धोनीच्या विंटेज खेळीमुळे चेन्नईच्या समर्थकांना पैसा वसूल मॅच मिळाली. नाणेफेक जिंकून चेन्नईने गोलंदाजी करायचा निर्णय घेतला.

राजस्थानच्या फलंदाजीमध्ये सलामीवीर यशस्वी जयस्वाल (10) काही जास्त करू शकला नाही. परंतु, त्याचा जोडीदार जॉस बटलर आणि देवदत्त पडीकल या दोघांनी पुढे राजस्थानच्या फलंदाजीची जबाबदारी घेतली. बटलरने 36 चेंडूंमध्ये 52 धावा काढल्या तर देवदत्तने 26 चेंडूमध्ये 38 धावा काढल्या.

कर्णधार संजू सॅमसन हा खाते न उघडताच बाद झाला तर अश्विन (30) आणि हेटमायरच्या (30) चांगल्या कॅमिओमुळे राजस्थान 175 या सन्मान जनक धावसंख्येवर पोहोचली. आकाश सिंग, तुषार देशपांडे आणि रवींद्र जडेजा या तिघांनीही प्रत्येकी दोन बळी घेतले. फिरकी गोलंदाज मोईन आली याने जॉस बटलरचा महत्त्वाचा एकच बळी घेतला.

176 धावांचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड (8) हा लवकरच बाद झाला. देवान कॉन्वे आणि अजिंक्य रहाणे चेन्नईची पारी पुढे नेली. देवान कॉलनी 38 चेंडूंमध्ये अर्धशतक केले तर अजिंक्य रहाणेने 19 चेंडूंमध्ये 31 धावा काढल्या. शिवम दुबे(8), मोईन आली (7) आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेला अंबाती रायडू (1) हे तिघे स्वस्तातच बाद झाले.

Shapit Gandharva : शापित गंधर्व – लेख 33 – ‘विमी’ अर्श से फर्श पर

त्यानंतर रवींद्र जडेजा (25) आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी (32) या दोघांच्या तुफानी खेळेमुळे चेन्नई लक्षाचा जवळ गेली परंतु अंतिम चेंडू वरती पाच धावांची गरज असताना संदीप शर्मा ने परिपूर्ण योर्कर टाकला आणि चेन्नई हा सामना हरली. राजस्थान कडून गोलंदाजी करताना फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहल या दोघांनीही प्रत्येकी दोन बळी घेतले. संदीप शर्मा ने ही सुद्धा एक बळी घेतला तर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या ऍडम झम्पाने पण एक बळी घेतला.

चेन्नई भलेही कालचा सामना हरले असतील तरीही कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या विंटेज खेळीमुळे (IPL 2023) समर्थकांना पैसा वसूल मॅच मिळाली. चेन्नईचा संघ सध्या दुखापतीने त्रासलेला आहे. बेन स्टॉक आणि दीपक शहर सारखे स्टार खेळाडू चेन्नईकडे उपलब्ध नाहीत. तर दुसरीकडे राजस्थान हे चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आयपीएल ट्रॉफी जिंकायचे लक्ष घेऊनच मैदानावर उतरतात असे दिसत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.