IPL 2023-विराट कोहलीच्या शतकी खेळीने आरसीबीला विजयासह मिळाले अंकतालिकेत चौथे स्थान.

एमपीएससीन्यूज:(विवेक कुलकर्णी)हैदराबाद येथे झालेल्या कालच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने हैदराबाद संघाला 8 गडी आणि चार छेद राखून दणदणीत मात देत आपल्या 7 व्या विजयासह प्ले ऑफ मध्ये आपली जागा बळकट करण्याची आशा पल्लवित केली (IPL 2023) आहे.

त्याआधी नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सनरायजर्स हैदराबाद संघाने आपल्या 20 षटकात 5 बाद  186 धावा केल्या,चौथ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या हेन्रीक क्लासेनने एक क्लासिक खेळी करताना 49 चेंडूत आपले आयपीएलमधले पहिले शतक पूर्ण केले, षटकार मारुन.ज्यामध्ये 8 चौकार आणि 6 उत्तुंग षटकार सामील होते.या एका सुंदर खेळीच्या जोरावर हैदराबाद संघाने लढण्यासाठी योग्य अशी धावसंख्या उभारली खरी,पण कोहलीच्या आणखी एका विराट शतकी खेळी मुळे हे आव्हान फारच मामुली भासले.हे त्याचे सहावे आयपीएल शतक आहे,याचबरोबर त्याने आपले नाव आयपीएलच्या इतिहासात द युनिव्हर्सल बॉस म्हणजेच ख्रिस गेलं सोबत विक्रमाच्या पुस्तकात सोनेरी अक्षराने लिहले आहे.आता विराट आणि गेल हे दोघेच प्रथम क्रमांकावर आहेत, आणि गेल आता पुन्हा खेळेल न खेळेल या मुळे हा विक्रमही लवकरच एकट्या कोहलीच्या नावावर होण्याची शक्यता जास्त आहे.

हैदराबाद संघाची सुरुवात अतिशय खराब झाली होती. अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी दोघेही मायकेल ब्रेसवेलच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने गाईड संघाची अवस्था दोन बाद 28 अशी झाली होती, यानंतर मात्र कर्णधार मार्करम आणि क्लासेन या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 74 धावांची भागीदारी ,(ज्यात मार्करमचा वाटा फक्त 18 धावांचा होता)करुन डाव काही प्रमाणात सावरला.याचवेळी कर्णधार मार्करम 18 धावा करुन शाहबाज अहमदच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला,यानंतर मात्र हरी ब्रूक्स आणि क्लासेन या जोडीने तडाखेबंद फलंदाजी करत संघाला 186 धावांची चांगलीच मजल मारुन दिली,आपले पहिले शतक पूर्ण झाल्यानंतर क्लासेन हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर त्रिफळाबाद झाला,पण त्याने संघासाठी एक मोठी खेळी करुन(IPL 2023) आपला सिंहाचा वाटा उचलला होता.

Talegaon Dabhade : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतली किशोर आवारे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

या लक्ष्याचा आणि आपले प्ले ऑफ मधले स्थान पक्के करण्यासाठी आरसीबी संघाला जशी सुरुवात अपेक्षित होती अगदी तशीच सुरुवात कोहली आणि डूप्लेसी जोडीने करुन दिली. दोघेही आक्रमक अंदाजात आकर्शकही खेळत होते.आधी 50, मग शतकी, मग जवळपास पाऊणेदोनशे धावांची जबरदस्त सलामी दिल्याने हीच जोडी संघाला 10 गडी राखून मोठा विजय मिळवून देईल असे वाटत असतानाच प्रथम कोहली शतक पूर्ण करून अन नंतर थोड्याच वेळात डूप्लेसीही 71 धावा करुन बाद झाला,पण तोवर विजयाची केवळ औपचारिकताच उरली होती ,ती मॅक्सवल आणि ब्रेसवेल या जोडीने पूर्ण करत संघाला 8 गडी आणि चार चेंडू राखून मोठा विजय तर मिळवून दिलाच, पण या विजयासोबत अंकतालिकेतही चौथा क्रमांक मिळवून देत मुंबई इंडियन्स खतरा ही निर्माण केला आहे, आता प्ले ऑफचे गणित आणखीनच बिकट झाले आहे आणि रंगतदारही त्यामुळे उर्वरित सामन्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले(IPL 2023) आहे.

विक्रमादित्य कोहलीला सामन्याचा मानकरी म्हणून गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक
सनरायजर्स हैदराबाद
5 बाद 186
क्लासेन 104,मार्करम 18,ब्रूक्स नाबाद 27
ब्रेसवेल 13/2 सिराज 37/1
पराभूत विरुद्ध
रॉयल चॅलेंजर बंगलोर
2 बाद 187
कोहली 100,डूप्लेसी 71,ब्रेसवेल नाबाद 4
भुवनेश्वर 48/1नटराजन 34/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.