IPL 2023 : गुरु विरुद्ध शिष्य मध्ये कोण बाजी मारेल?

एमपीसी न्यूज – 2008 पासून भारतामध्ये होणारी इंडियन प्रीमियर ( IPL 2023) लीग ही क्रिकेट स्पर्धा आजपासून (शुक्रवार 31 मार्च ) पासून पुन्हा सुरू होत आहे. आयपीएलचा पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा असणार आहे. गुजरात टायटन्स हे मागच्या वर्षी आयपीएल जिंकलेले आहेत. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्स संघ मागच्या वर्षी लीग टेबलमध्ये नवव्या स्थानावर होता. तर आज या दोघांच्या सामन्यांमध्ये काय होऊ शकते, संघामध्ये कोण कोण अकरा जण घेतली जातील व कशा प्रकारचा सामना आपण बघू शकतो हे आपण जाणून घेऊ.
काल काही रिपोर्ट्स आले होते की चेन्नई कडून महेंद्रसिंग धोनी हा दुखापतीमुळे खेळणार नाही. पण सी एस के च्या सीईओने सांगितले आहे की धोनी आज शंभर टक्के खेळेल. मग त्यानुसार ऋतुराज गायकवाड, देवान कॉन्वे , मोईन आली , महेंद्रसिंग धोनी (C), अंबाती रायडू, बेन स्टोक्स , रवींद्र जडेजा, शिवम दुबे, दीपक चाहर, द्वेन प्रिटोरियस , सिमरजित सिंग या खेळाडूंसह चेन्नईचा संघ हा असा काही दिसेल.
Chikhali : रामनवमीच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र पळवले
गुजरात टायटन्स कडून डेव्हिड मिलर हा दुखापतीमुळे बाहेर असणार आहे. या रिपोर्टनुसार शुभमन गील, रिद्धिमान सहा, केन विलियम्सन , हार्दिक पांड्या (C), मेथीव वेड , अभिनव मनोहर, राहुल तेवातिया, राशिद खान , जयंत यादव, मोहम्मद शमी, अल्जारी जोसेफ गुजरातचा संघ हा असा असेल असा अंदाज बांधण्यात येत आहे.
गुजरातच्या मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये ही मॅच होणार आहे. दोन्ही पण संघाची फलंदाजी उत्कृष्ट असल्याने हा एक जास्त धावसंख्या असलेला सामना होईल असा अंदाज बांधण्यात येत आहे. कागदावर चेन्नईचा संघ हा गुजरातपेक्षा थोडा कमी पडत आहे असा वाटत असेल तरी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई बऱ्याच वेळा आपल्याला आश्चर्यचकित केले आहे. हार्दिक पांड्या हा धोनीला स्वतःचा गुरु मानत असल्याने स्वतःच्याच गुरुना तो पराभवित करण्यासाठी उत्सुक असेल असेही आपण सांगू शकतो. कोण जिंकेल हे तर फक्त ( IPL 2023) सामना बघितल्यावर आपल्याला कळेल.