IPL 2023 : आयपीएलची ट्रॉफी यावर्षी तरी देशाच्या राजधानीत जाणार का?

एमपीसी न्यूज – दिल्ली कॅपिटल्स हा देशाच्या राजधानी दिल्ली येथील स्थित एक क्रिकेट संघ आहे जो इंडियन प्रीमियर लीग मध्ये खेळतो. हा संघ जीएमआर ग्रुप आणि जेएसडब्ल्यू ग्रुप या दोघांच्या मालकीचा आहे. नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियम हे दिल्ली कॅपिटल चे प्राथमिक मैदान आहे. (IPL 2023) दिल्ली कॅपिटल चे नाव आधी दिल्ली डेअरडेव्हिल्स होते. 2018 मध्ये त्यांचे नाव दिल्ली कॅपिटल्स झाले. दिल्ली कॅपिटल्स हे आजपर्यंत एकही आयपीएल ट्रॉफी जिंकलेले नाहीत. 2020 च्या आयपीएल मध्ये ते अंतिम सामन्यापर्यंत गेले होते परंतु तिथे त्यांना मुंबई इंडियन्स ने हरवून स्वतःची पाचवी आयपीएल ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली होती. दिल्ली कॅपिटल्स गेल्या काही वर्षांपासून बरेच तरुण खेळाडूांना संधी देते. सुरुवातीच्या वर्षांमध्ये माजी भारतीय तुफानी फलंदाज वीरेंद्र सहवाग हा त्यांचा कर्णधार होता.

 

ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटू रिकी पॉंटिंग हा दिल्ली कॅपिटल चा मुख्य प्रशिक्षक आहे. अजित आगरकर आणि शेन वॉटसन हे दोघे सुद्धा प्रशिक्षक म्हणून दिल्ली कॅपिटल्स संघामध्ये आहेत. माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली हा संघाचा संचालक आहे. ऋषभ पंत ला अपघातात दुखापत झाल्यामुळे तो यावर्षी आयपीएल खेळणार नाही आहे. मग त्याच्या जागी ऑस्ट्रेलियन सलामी फलंदाज डेव्हिड वॉर्नर हा दिल्ली कॅपिटल रस्ता कर्णधार असेल. रीली रोसौ, मनीष पांडे, ईशांत शर्मा इत्यादी खेळाडूंना दिल्ली कॅपिटल सनी यावर्षीच्या लिलावामध्ये विकत घेतले आहे.

Chikhali : विश्व श्री राम सेना आयोजित श्री राम जन्मोत्सवाची जल्लोषात सांगता

 

आयपीएलच्या बाकी संघांप्रमाणेच दिल्ली कॅपिटल्स ची सुद्धा फलंदाजी ही चांगली दिसत आहे. पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, सरफराज खान, मिचेल मार्श हे दिल्लीचे फलंदाज आहेत. (IPL 2023) त्यावरून स्टार अष्टपैलू अक्सर पटेल हा सुद्धा फलंदाजी मध्ये आहेच. डेव्हिड वॉर्नर हा स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःचे शंभर टक्के देईल असे मानले जात आहे. 2016 मध्ये डेव्हिड वॉर्नरने स्वतःच्या बळावर हैदराबादला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले होते. तोही कामगिरी परत करू शकतो का? हे बघणे आहे. कुलदीप यादव, एनरिक नोरखिया, खलील अहमद, मुस्तफिझुर रेहमान हे गोलंदाजी मध्ये असल्यामुळे दिल्ली संघाचा गोलंदाजी विभाग मजबूत दिसतो.

 

डेव्हिड वॉर्नर याला जास्त कर्णधार पदाचा अनुभव नाही. आयपीएल मध्ये तर फक्त दोनच वर्षे तो कर्णधार होता. त्यावरून ऋषभ पंत च्या दुखापतीमुळे दिल्ली कॅपिटल्स कडे स्वतःचा असा बॅकअप यष्टीरक्षक कोण हा एक प्रश्नच आहे. त्यांनी एकही बदली विकेटकीपर घेतलेला. परंतु सरफराज खान याला यष्टीरक्षण करण्याचा अनुभव आहे. देशांतर्गत होणाऱ्या सामन्यांमध्ये त्यांने बरेचदा यष्टीरक्षण केले आहे. दिल्ली कॅपिटल्स चा एवढा मजबूत संघ नक्कीच आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा मानकरी ठरू शकतो.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.