IPL 2023 – माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला स्वतःच्या स्वप्नातली निवृत्ती मिळेल का?

एमपीसी न्यूज – चेन्नई सुपर किंग्स हा चेन्नई, भारत येथे (IPL 2023) स्थित असणारा एक क्रिकेट संघ आहे जो इंडियन प्रीमियर लीग मध्ये खेळतो. हा संघ इंडिया सिमेंट लिमिटेड यांच्या मालकीचा आहे. चेन्नई येथील एम ए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियम हे सीएसके चे प्राथमिक मैदान आहे. चेन्नई हा संघ 2016 आणि 17 मध्ये प्रतिबंधित करण्यात आला होता. चेन्नई सुपर किंग्स आयपीएल मध्ये (IPL 2023) भरपूर यशस्वी संघ आहे. आज पर्यंत त्यांनी 4 वेळा आयपीएलचे विजेतेपद आणि दोन वेळा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद जिंकले आहे. या संघाचे समर्थक संपूर्ण देशभरात पसरलेले आहेत. महेंद्रसिंग धोनी याच्यामुळे संघाला देशभरात भरपूर प्रतिसाद मिळतो.

 

 

 

 

स्टीफन फ्लेमिंग, मायकल हसी, द्वेन ब्रावो हे यावर्षी चेन्नई सुपर किंग्स च्या प्रशिक्षक विभागामध्ये असणार आहेत. 2008 पासून चेन्नईचा कर्णधार राहिलेला महेंद्रसिंग धोनी हाच यावर्षीही चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार असणार आहे. मागच्या वर्षी धोनीने स्वतःची कर्णधार पदावरून निवृत्ती जाहीर केली होती. त्यावेळी झालेला तात्पुरता कर्णधार रवींद्र जडेजा याला कर्णधार पदाच्या दबावांमध्ये स्वतःचे खेळणे जमले नाही. म्हणून आयपीएलच्या मध्यातच धोनीने कर्णधार पद पुन्हा स्वीकारले. म्हणून यावर्षीही तो कर्णधार असेल. यावर्षीच्या लिलावामध्ये इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स याला चेन्नईने उचलले आहे. याचबरोबर त्यांनी भारताचा अजिंक्य राहणे व काईल जेमीसन यालाही विकत घेतले आहे.

मागच्या बऱ्याच वर्षापासून चेन्नई सुपर किंग्स स्वतःच्या अनुभवामुळे जाणली जाते. यावर्षी एम एस धोनी, देवान कॉन्वे, मोईन आली, बेन स्टोक्स, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, हे सगळे अनुभवी खेळाडू आहेत त्याचबरोबर ऋतुराज गायकवाड, मुकेश चौधरी, राजवर्धन हंगारगेकर असे तरुण खेळाडू ही आहेत. आयपीएल ला हे चांगले जाणतात आणि याच्या आधीही एम एस धोनीने अनुभवाचा चांगला उपयोग करून आयपीएल जिंकले आहे. चेन्नईची फिरकी गोलंदाजी ही सुद्धा फार चांगली दिसत आहे. रवींद्र जडेजा, मीचेल सेंटनर, महेश तीक्षणा हे चांगले फिरकी गोलंदाजी मध्ये पर्याय आहेत.

 

 

 

कागदावर चेन्नईची वेगवान गोलंदाजी थोडी दुर्मिळ दिसते. सुरुवातीच्या षटकांमध्ये दीपक शहर हा चांगली गोलंदाजी करतो. पण द्वेन ब्रावोने मागच्या वर्षी निवृत्ती घेतल्यामुळे शेवटच्या षटकांमध्ये कोण गोलंदाजी करेल हा धोनी समोर भरपूर मोठा प्रश्न आहे. त्यांनी काईल जेमिसन याला घेतले आहे परंतु 20 ओवरच्या खेळांमध्ये त्याला जास्त अनुभव नाही. बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार हे धोनीचे अखेरचे आयपीएल असणार आहे. तो स्वतःची निवृत्ती एका ट्रॉफी बरोबर करायला उत्सुक असेल. धोनीने याच्या आधी आयपीएल मध्ये जरी संघ दुर्मिळ दिसत असला तरी प्रत्येक खेळाडू कडून त्याचे शंभर टक्के घेतले आहेत व ट्रॉफी ही जिंकली आहे. मग स्वतःच्या (IPL 2023) स्वप्नातली निवृत्ती ही धोनीला मिळते की नाही हे बघावे लागेल.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.