IPL 2023 – सलग दुसऱ्यांदा गुजरात टायटन्सला आयपीएलचे विजेतेपद मिळेल का?

एमपीसी न्यूज – गुजरात टायटन्स हा अहमदाबाद, गुजरात येथे (IPL 2023) स्थित एक क्रिकेट संघ आहे.  जो इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळतो. या संघाची स्थापना मागच्या वर्षी झाली म्हणजे मागच्या वर्षीचे आयपीएल हे या संघाचे पहिलेच आयपीएल होते. स्वतःच्या पहिल्याच आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करत गुजरात टायटन्सने विजेतेपद पटकावले होते.

ही टीम सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्स यांच्या मालकीची आहे. गुजरात मधल्या मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियम हे गुजरातचे प्राथमिक स्टेडियम आहे. गुजरात टायटन्सने आयपीएलचे विजेतेपद हे एकदा जिंकले आहे व ते लीग टेबलवरही पहिल्या क्रमांकावर होते.

संघाचा मुख्य प्रशिक्षक हा भारतीय माजी गोलंदाज आशिष नेहरा आहे. फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून साउथ आफ्रिकेचा गॅरी कर्स्टन याला घेतले आहे. गॅरी कर्स्टन याच्याच प्रशिक्षणाखाली भारताने 2011 चा क्रिकेट विश्वचषक जिंकला होता.

मागच्या वर्षीचा पराक्रम बघून यावर्षीही हार्दिक पांड्या हाच गुजरात टायटन्सचा कर्णधार असणार आहे. 2023 च्या लिलावामध्ये गुजरात टायटन्सने केन विल्यम्सन, शिवम मावी, ओडियन स्मिथ, के एस भरत, रिद्धिमान सहा, इत्यादी ना विकत घेतले आहे. म्हणून हा संघ मागच्यावेळीपेक्षा अजून मजबूत दिसत आहे.

मागच्या वर्षी गुजरात टायटन्सची फलंदाजी थोडी दुर्मिळ दिसत होती. बऱ्याच वेळा (IPL 2023) त्यांना राहुल तेवातिया, राशिद खान, डेव्हिड मिलर यांची गरज लागत होती. परंतु, यावर्षी केन विल्यमसन, के एस भरत, यांच्यामुळे फलंदाजीला चांगले संतुलन मिळाले आहे. शिवम मावी, मोहम्मद शमी, राशिद खान, मोहित शर्मा त्यावरून हार्दिक पांड्या, राहुल तेवातिया या अष्टपैलू मूळ गोलंदाजीतही कुठे कमी अशी दिसून येत नाहीये.

गुजरात टायटन्सचा संघ तसा बघायला गेला तर कुठे जातात दुर्मिळ दिसत नाही. केन विलियम्सन हा 20 षटकांच्या सामन्यांमध्ये जास्त चांगली अशी कामगिरी करून येत नाहीये असे दिसत आहे. केन विलियमसनला गृहीत धरले तर गुजरात टायटन्स ची फलंदाजी ही कुठेच दुर्मिळ दिसत नाही. पण त्याचे फॉर्म मध्ये असणे हे गरजेचे आहे.

Pune : कुक पदासाठी डमी उमेदवार म्हणून परीक्षेला बसलेल्या दोघांना अटक

राशिद खान हा फिरकी गोलंदाज सोडला तर अजून कोणी अनुभवी फिरकी गोलंदाज गुजरात टायटन्स कडे दिसून येत नाही. राहुल तेवातिया हा एक पर्याय आहे पण दोघेही लेग स्पिन च टाकतात. ऑफ स्पिन चा पर्याय गुजरात कडे दिसून येत नाही. याच्या आधी फक्त चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोनच संघाने सलग दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. गुजरात टायटन्स सुद्धा या यादीमध्ये नाव जोडते का नाही ते बघावे लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.