IPL 2023 : यंदा हैद्राबाद आयपीएल गाजविणार का?

एमपीसी न्यूज – सनरायझर्स हैदराबाद हा हैदराबाद, तेलंगणा, भारत येथे स्थित एक फ्रँचायझी क्रिकेट संघ आहे. हा संघ ‘सन ग्रुप’ च्या कलानिथी मारन यांच्या मालकीचा आहे आणि 2012 मध्ये हैदराबाद-आधारित डेक्कन चार्जर्स संपुष्टात आल्यानंतर त्याची स्थापना झाली.(IPL 2023) सनरायझर्स हैदराबादने आजपर्यंत एकदा (आयपीएल 2016) चे विजेतेपद जिंकले आहे. व ते 2018 आयपीएल मध्ये द्वितीय स्थानावर होते. 55000 क्षमता असलेले राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान, हैदराबाद हे त्यांचे प्राथमिक मैदान आहे.
हैदराबादने टॉम मूडीच्या जागी 2023 आयपीएलमध्ये, माझी वेस्ट इंडियन क्रिकेटपटू, ब्रायन लारा यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. साऊथ आफ्रिकेचा सलामी फलंदाज (IPL 2023) एडन मार्करम याची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 2022 च्या खराब परफॅारमन्समुळे केन विलियमसनला कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले. लिलावाच्या पूर्वी हैदराबादने बारा खेळाडूंना राखून ठेवले. त्यांनी या वर्षी सोडलेल्या खेळाडूंमध्ये केन विलियम्सन, निकोलस पू, जगदीशा सुचित इत्यादी नामवंत खेळाडूंचा समावेश आहे.
Chakan : जागेवर ताबा घेण्यासाठी आलेल्या जमावाकडून दोघांना मारहाण
लिलावाच्या दिवशी त्यांनी हॅरी ब्रुक, मयंक अगरवाल, हेनरिक क्लासेन, आदिल रशीद या खेळाडूंची हैदराबाद संघासाठी निवड केली होती. मयंक, अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी यांचा टॉप ऑर्डर आणि मार्कराम, हॅरी ब्रूक आणि ग्लेन फिलिप्स किंवा हेनरिक क्लासेन यांचा समावेश असणारी मधल्या फळीमुळे सनरायझर्सला उत्कृष्ट फलंदाजी मिळते, विशेषत: जेव्हा वॉशिंग्टन सुंदर आणि जॅनसेन हे दोन अष्टपैलू क्रिकेटर एकत्र येतात.
सनरायझर्सकडेही मजबूत भारतीय वेगवान गोलंदाज आहेत. अनुभवी भुवनेश्वर कुमार व्यतिरिक्त त्यांच्याकडे उमरान मलिक, टी नटराजन आणि कार्तिक त्यागी आहेत. जॅनसेन आणि फझलहक फारुकी यांच्या कडे चांगले बॅक अप आहेत. हैदराबाद फिरकी गोलंदाजीत थोडे कमी पडत आहेत.(IPL 2023) एक आदिल रशीद सोडला तर त्यांच्याकडे असा एकही नामवंत फिरकी गोलंदाज नाही. पण हैदराबादच्या विकेटवर सनरायझर्स हैदराबाद नक्कीच उत्तम कामगिरी करू शकते. नवीन व्यवस्थापन आणि नवीन खेळाडू, त्याचबरोबर अनुभवी आणि नवे चेहरे यांची चांगली मिसळ हैदराबाद मध्ये दिसून येते. जर सर्व काही जुळून आले तर हैदराबाद नक्कीच चांगली कामगिरी या येणाऱ्या 2023 च्या आयपीएल मध्ये करू शकते.