IPL 2023 – रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला पुन्हा यश मिळेल?

एमपीसी न्यूज – मुंबई इंडियन्स हा मुंबई येथे स्थित क्रिकेट (IPL 2023) संघ आहे, जो इंडियन प्रीमियर लीगमध्ये भाग घेतो. पाच आयपीएल विजेतेपदांबरोबर मुंबई इंडियन्स हा आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी संघ आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज यांची उप कंपनी इंडियाविन स्पोर्ट्स यांच्या मालकीत हा संघ येतो. मुंबईतले वानखेडे स्टेडियम हे मुंबई इंडियन्सचे प्राथमिक मैदान आहे. मुंबईने आजपर्यंत पाच आयपीएल आणि दोन चॅम्पियन्स लीग जिंकल्या आहेत.

2008 मध्ये जेव्हा या संघाची स्थापना झाली, तेव्हा माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा या संघाचा कर्णधार होता. त्याच्या निवृत्तीनंतर रोहित शर्मा याने मुंबई इंडियन्सचे कर्णधार पद स्वीकारले. मुंबई इंडियन्सने जे पाच आयपीएल जिंकले आहेत ते सर्व रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच जिंकले आहेत. “दुनिया हिला देंगे हम” हे मुंबई इंडियन्सचे बोधवाक्य पूर्ण देशभरात लोकप्रिय आहे. देशाच्या विविध ठिकाणी त्यांचे समर्थक भरपूर प्रमाणात आहेत.

जहीर खान, महेला जयवर्धने, मार्क बाउचर, कायरन पोलार्ड हे सर्वजण मुंबई इंडियन्सच्या कोचिंग विभागामध्ये प्रशिक्षकांचे काम करतात. संघाचा मार्गदर्शक म्हणून सचिन तेंडुलकर हाही बरेच वेळा (IPL 2023) संघाच्या आयपीएल दौऱ्यावरती त्यांच्याबरोबरच असतो. 2013 पासून असणारा कर्णधार रोहित शर्मा हाच यावर्षीही मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. रोहित सध्या भारतीय क्रिकेट संघाचा सुद्धा कर्णधार आहे.

आयपीएलमध्ये त्यांनी मुंबई इंडियन्सला बरेच यश मिळवून दिले आहे. 2023 च्या आयपीएलच्या लिलावामध्ये मुंबई इंडियन्सने कॅमेरॉन ग्रीन, जे रिचर्डसन, पियुष चावला इत्यादी खेळाडूंना विकत घेतले. मागच्या वर्षी लीग टेबल मध्ये मुंबई इंडियन्स शेवटला आले होते. तर तेव्हा वाटणारी कमजोरी यावर्षीच्या लिलावामध्ये मुंबई इंडियन्स ने भरून काढायचा प्रयत्न केला आहे.

कर्णधार रोहित शर्मा, यष्टीरक्षक ईशान किशन, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, कॅमेरॉन ग्रीन, डेवाल्ड ब्रेव्हिस, टिम डेव्हिड या खेळाडूंमध्ये आधीच्या वर्षांसारखीच मुंबई इंडियन्सची फलंदाजी ही भरपूर सक्षम दिसत आहे. वानखेडे स्टेडियमच्या विकेट वरती ही फलंदाजी समोरच्या संघांना भरपूर धोकादायक ठरू शकते.

मागच्या वर्षी मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी ही दुर्मिळ ठरली. परंतु यावर्षी त्यांनी जोफ्रा आर्चर, जेसन बेहेरेंडॉर्फ, जे रिचर्डसन या गोलंदाजांना घेऊन स्वतःची वेगवान गोलंदाजी चांगली केली आहे. भारताचा स्टार क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह भलेही दुखापतीमुळे बाहेर असला तरी हे खेळाडू त्याची खंत जाणून देणार नाहीत असे वाटत आहे.

2021 चा लिलावामध्ये राहुल चाहरला गमावल्यापासून मुंबई इंडियन्स संघाची फिरकी गोलंदाजी ही कमीच पडली आहे. यावर्षी त्यांनी पियुष चावला, कुमार कार्तिकेय आणि रितिक शौकीन यांना स्वतःच्या संघात घेतले आहे. परंतु पूर्ण फिरकी गोलंदाजी मध्ये यांचा फॉर्म कसा असेल हे काही सांगता येणार नाही. जसप्रीत बुमराह नसल्याने मुंबईकडे गोलंदाजीमध्ये स्वतःचा असा हुकमाचा एक्का नाहीये.

Vadgaon Maval : पाणी योजनांच्या कामांना गती द्या – आमदार सुनिल शेळके

म्हणून एखाद वेळेस जसप्रीत बुमराह दुखापतीने बाहेर असल्याचा सुद्धा मुंबई गोलंदाजीला त्रास होऊ शकतो. मागच्या वर्षी कायरनच्या निवृत्तीनंतर त्याची जागा मुंबईमध्ये कोण घेते हे बघायला हवे. परंतु ह्याच्यापेक्षाही दुर्मिळ संघ असताना रोहित शर्मा ने याच्या आधी मुंबई इंडियन्सला यश मिळवून दिले आहे. त्याच यशाची तो यावर्षीही पुनरावृत्ती करतो का नाही हे बघायला लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.