IPL Auction : आयपीएलची लिलाव प्रक्रिया 18 फेब्रुवारीला

एमपीसी न्यूज – आज आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने लिलावाची तारीख जाहीर केली आहे. फेब्रुवारीच्या 18 तारखेला आयपीएलची लिलाव प्रक्रिया पार पडणार असल्याची घोषणा आयपीएलने अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून केली.

यंदाच्या आयपीएलची लिलावाआधी प्रत्येक संघाला आपल्या संघातील कायम राखलेल्या खेळाडूंची यादी आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सुपूर्द करायची होती. त्यानुसार 20 जानेवारीपर्यंत सर्व संघांनी आपल्या संघातून करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी आयपीएलला दिली. आता 18 तारखेला होणाऱ्या लिलावात सर्व संघ आपल्याला हवा असलेला खेळाडू घेण्यासाठी उत्सुक आहेत.

_MPC_DIR_MPU_II

करारमुक्त झालेल्या भारतीय खेळाडूंना पुढील हंगामात आयपीएलमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांना 4 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे. आयपीएलचा यंदाचा हंगाम 11 एप्रिल ते 6 जून या कालावधीत रंगण्याची शक्यता आहे. वर्तविली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1