IPL Meeting: आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची 2 ऑगस्टला बैठक; वेळापत्रक निश्चित होण्याची शक्यता

IPL Governing Council meeting on August 2; Likely to plan schedule युएई मधील व्यवस्थापनेबद्दल देखील महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.

एमपीसी न्यूज – आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची 2 ऑगस्टला बैठक होणार आहे. या बैठकीत आयपीएल 2020 चं वेळापत्रक आणि युएईमधील व्यवस्थेबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलची महत्वपूर्ण बैठक येत्या 2 ऑगस्टला होणार आहे. या बैठकीत आयपीएलचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच युएई मधील व्यवस्थापनेबद्दल देखील महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.

_MPC_DIR_MPU_II

एमिरेट्स क्रिकेट बोर्डाने सोमवारी (दि.27) बीसीसीआयचे अधिकृत पत्र मिळाल्याचे संगीतले आहे. त्याअगोदर आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी 29 सप्टेंबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान आयपीएल होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, 2 ऑगस्टला होणाऱ्या बैठकीत खेळाडूंच्या क्वारंटाइन कालावधी संबंधी, त्यांच्या राहण्याची व प्रवासाच्या व्यवस्थेसंबंधी चर्चा होणार आहे. आयपीएल प्रसारण बाबत निर्णय सुद्धा या बैठकीत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.