_MPC_DIR_MPU_III

IPL 2020 Time Table : आयपीएलचे वेळापत्रक जाहीर, पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये रंगणार

IPL schedule announced, first match to be played between Mumbai Indians and Chennai Super Kings.

एमपीसी न्यूज – इंडियन प्रीमियर लीगच्या 13वा हंगाम 19 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. 13व्या हंगामाची सुरुवात गतवर्षाची आयपीएल विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि रनरअप चेन्नई सुपर किंग्समधील सामन्याने होणार आहे.

बीसीसीआयने रविवारी गव्हर्निंग काऊंन्सिलची बैठक बोलावली होती. या बैठकीत आयपीएलच्या 13व्या सीझनसंदर्भात सर्व औपचारिक गोष्टी पूर्ण करण्यात आल्या.

बीसीसीआयकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 13व्या सीझनचं आयोजन 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे.

इंडियन प्रीमियर लीगमधील 13वा सीझन 53 दिवस चालणार आहे. यादरम्यान 60 सामने खेळवण्यात येणार आहेत.

संपूर्ण टुर्नामेंटच्या फॉरमॅटमध्ये कोणताही बदलाव करण्यात येणार नाही. 13व्या सीझनमध्ये 10 डबल हॅडर सामने खेळवले जाणार आहेत.

सामन्याची सुरुवात भारतीय वेळेनुसार 7 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे. तर डबल हॅडर सामन्यांच्या दिवशी सामना 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु करण्यात येणार आहे.

संपूर्ण वेळापत्रक खालील प्रमाणे –

_MPC_DIR_MPU_II

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1