IPL Teams : आयपीएलमध्ये 2022 पासून 10 संघ खेळणार

एमपीसी न्यूज – आयपीएलमध्ये आतापर्यंत 8 संघ खेळत होते. 2022 पासून आता आयपीएलमध्ये 10 संघ खेळणार आहेत. अहमदाबाद येथे झालेल्या बीसीसीआयच्या एजीएम बैठकीत आज (गुरुवारी) हा निर्णय घेण्यात आला आहे.

आयपीएलमध्ये दहा संघांचे मिळून 94 सामने असतील ज्यासाठी सुमारे अडीच महिने लागणार आहेत. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रकावर होण्याची शक्यता आहे.

आयपीएलच्या संपूर्ण कालावधीसाठी दिग्गज परदेशी खेळाडूंची उपलब्धता सुनिश्चित करणेही आवश्यक आहे.

प्रसारणाची रक्कम दर वर्षी 60 सामन्यांसाठी असते. आता पुन्हा नव्याने याचं नियोजन करावे लागणार आहे. सध्या स्टार इंडियाने सन 2018-2022 दरम्यानच्या कालावधीसाठी 16,347.50 कोटी रुपये दिले आहेत. ही किंमत दरवर्षी होणाऱ्या 60 सामन्यांसाठी आहे. गौतम अदानी आणि संजीव गोएंका (माजी फ्रेंचायझी राइझिंग पुणे सुपर किंग्सचे मालक) ही काही मोठी नावे आहेत ज्यांना संघ खरेदी करण्यात रस आहे.

बीसीसीआय T20 विश्वचषक आणि पन्नास षटकांच्या विश्वचषकासाठी कर सवलती साठी सरकारशी चर्चा करणार आहे. तसेच, भारतीय ऑलिम्पिक संघटने कडून स्पष्टता मिळाल्यास 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यासंबंधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलला भारत पाठिंबा देईल असेही या बैठकीत ठरलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.