Pune : इराणी सोनसाखळी सराईताकडून 5 गुन्हे उघडकीस

गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने अडीच लाखांचा ऐवज केला हस्तगत

एमपीसी न्यूज : इराणी सोनसाखळी चोरट्याकडून चोरीचे 5 गुन्हे उघडकीस आणून गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने चोरीचा अडीच लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे.

मोहम्मद अफसर सय्यद (वय 27, रा. आंबवली, ठाणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांकडून चेन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेण्यात येत होती. दरम्यान पोलिसांना चेनचोरी करणारा सराईत मोहम्मद सय्यद याला भोईवाडा, मुंबई येथे पकडल्याची माहिती मिळाली. त्याने पुण्यातील काही ठिकाणी त्याच्या साथीदारांना घेऊन चेनचोरीचे गुन्हे केल्याची देखील माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली आणि त्याच्याकडून पुण्यातील चोरीचे 5 गुन्हे उघडकीस आणले. मोहम्मदकडून एकूण 92 ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. याची किंमत 2 लाख 40 हजार एवढी आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.