ISKON: इस्कॉन चे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त त्यांचा जीवन परिचय

एमपीसी न्यूज: आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) या संस्थेचे संस्थापक आचार्य कृष्णकृपा श्रीमूर्ती अभयचरणारविंद भक्तीवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या 126व्या (ISKON) जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन चरित्राचा थोडा परिचय.

17 सप्टेंबर 1965 रोजी कृष्णकृपाश्री मूर्ती अभयचरणारविंद भक्तीवेदांत स्वामी न्यूयॉर्कच्या बंदरावर पोहोचले. त्यांच्या आगमनाची दखल फारच थोड्या अमेरिकन लोकांनी घेतली, परंतु प्रभुपाद इतर परदेशी प्रवाशाप्रमाणे नव्हते.(ISKON) अमेरिकेतील लोकांना भारतातील वैदिक ज्ञान शिकवण्यासाठी श्रील प्रभुपाद अमेरिकेत गेले पाशात्य देशातील लोकांना प्राचीन वैदिक संस्कृतीचे तत्त्वज्ञान समजून सांगण्याची फार मोठी कामगिरी श्रील प्रभुपाद यांनी स्वीकारली. वयाच्या 81 व्या वर्षी 1977 साली ज्यावेळी श्रील प्रभुपाद यानी या जगाचा निरोप घेतला त्यावेळी त्यांनी त्यांची कामगिरी मोठ्या यशस्वीपणे पार पाडली .त्यांनी इस्कॉन या संस्थेची स्थापना केली, हरेकृष्ण आंदोलन त्यांनी संपूर्ण जगभर पसरवले कृष्ण भक्तीचा प्रचार करून त्यांनी जगभरात शंभरापेक्षा अधिक मंदिरांची उभारणी केली आणि आश्रम व सांस्कृतिक शिक्षण केंद्र उभारली.

शील प्रभुपाद यांचे लहानपणीचे नाव अभयचरण डे असे होते. 1 सप्टेंबर 1896 रोजी कलकत्त्याला एका सात्विक कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या लहानपणी जेव्हा भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती तेव्हा अभयने महात्मा गांधींच्या असहकार चळवळीत सहभाग घेतला,गांधीजींच्या हाकेला साथ देऊन ते त्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी झाले.(ISKON) 1922 साली अभयची भेट एका बुद्धिमान धार्मिक साधू पुरुषाशी झाली. त्या एकेश्वरवादी गौडिय वैष्णव परंपरेतील प्रमुख अध्यात्मिक मार्गदर्शकाचे नाव होते भक्तीसिद्धांत सरस्वती. अभयला त्यांनी सांगितले; तुम्ही भगवान चैतन्य महाप्रभूंची शिकवण इंग्रजी भाषेतून का देत नाही, आणि अभय वर त्यांचा या उपदेशाचा फार प्रभाव पडला.

Talegaon-Dabhade : सरसेनापती दाभाडे सरकार राजवाड्यावर ध्वजारोहण

अभयने भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांना आपल्या आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकारले आणि 1933 मध्ये अभय भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांचा शिष्य बनला आपल्या आध्यात्मिक गुरूंच्या आज्ञेचे पालन करण्याचा त्यांनी निश्चय केला. वैदिक ग्रंथांचा आणि तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला गुरूंच्या आज्ञेनुसार कृष्ण भावनाभावीत जीवन जगत ते 32 वर्ष  भारतात राहिले त्याच काळात त्यांनी संन्यास घेतला आणि त्यांना अभय चरणारविंद भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद असे नाव प्राप्त झाले .1965 साली वयाच्या 69 व्या वर्षी श्रील प्रभुपात मालवाहू जहाजातून न्यूयॉर्क शहरात गेले. समुद्रातील हा प्रवास फार धोकादायक होता त्या प्रवासात त्यांना हृदयविकाराचे धक्के आले.(ISKON) श्रील प्रभुपाद जेव्हा न्यूयॉर्कला पोहोचले तेव्हा त्यांच्याजवळ चाळीस रुपये म्हणजे सात अमेरिकन डॉलर होते. श्रीमद्भागवताच्या प्रथम स्कंदाच्या अनुवादाच्या काही प्रती त्यांनी अमेरिकेला आपल्या सोबत नेल्या. त्यांनी तेथे कृष्ण भावनेचा प्रचार सुरू केला .

तरुणांना त्यांचा हा कृष्ण भावनेचा सरळ सोपा आनंदी उपदेश अतिशय आवडला. त्यातील काही तरुणांनी पुढे येऊन श्रील प्रभुपाद यांचे शिष्यत्व स्वीकारले, त्यांच्या या शिष्यांच्या मदतीने प्रभूपदांनी न्यूयॉर्क येथे मंदिरासाठी एक छोटीशी खोली भाड्याने घेतली. 11 जुलै 1966 रोजी इस्कॉन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मृत संघ या संस्थेची स्थापना केली. पुढील अकरा वर्षांमध्ये जगातील सहा खंडांची चौदावेळा परिक्रमा करताना श्रील प्रभुपाद हजारो लोकांना कृष्ण भावनेचा प्रचार केला विविध प्रांतातील विविध स्त्री-पुरुषांनी पुढे येऊन श्रील प्रभुपादांच्या या दिव्य संदेशाचा स्वीकार केला .(ISKON) या सर्व भक्तांच्या मदतीने प्रभूपदांनी संपूर्ण जगभर इस्कॉन ची विविध केंद्रे उभारली. कृषी उद्योगासारखे अनेक उपक्रम राबवले प्रभू पदांच्या प्रोत्साहनाने या कृष्ण भक्तांनी मंदिरे उभारली, संस्कृती शैक्षणिक केंद्र गुरुकुल आणि ग्रामीण कृषी समाज उदयाला आले. इस्कॉन ची जगभरातील शाकाहारी उपहारगृहे खूपच लोकप्रिय आहेत.

 

संपूर्ण जगभर प्रचार करताना श्रील प्रभुपादअनेकदा भारतात आले, कृष्ण भक्तीचा प्रचार करताना कृष्ण भक्तीचे मूळ भारतात आहे आणि आपल्याला त्यांचे पोषण करायचे आहे याची जाणीव प्रभू पदांना होती, भारतात सुद्धा त्यांनी प्रचार करून वैष्णव परंपरेला पुन्हा उजाळा दिला आणि डझनभर मंदिरे उभारली. मयापुर, वृंदावन सारख्या पवित्र क्षेत्रातही त्यांनी सांस्कृतिक केंद्र स्थापन केली.(ISKON) सर्वात महत्त्वाची देणगी म्हणजे त्यांचे ग्रंथ त्यांचे ग्रंथ अधिकृतपणे गंभीरपणे स्पष्टतेमुळे बुद्धिमान वर्गाद्वारे फारच सन्मानित झालेले असून अनेक विद्यापीठातून शिक्षणक्रमासाठी क्रमिक पुस्तके म्हणून त्यांचा वापर केला जात आहे. त्यांचे साहित्य जगातील जवळजवळ 76 भाषांतून भाषांतरित झालेले आहेत.

वैदिक ग्रंथ भगवत गीता श्रीमद्भागवत श्री चैतन्य चरित्रामृत याचा श्रील प्रभुपाद यांनी इंग्रजी भाषेत अनुवाद केला त्यांच्या अनेक महान कार्यामध्ये या अनुवादाचाही समावेश आहे. डॉक्टर थॉमस जे हॉकिन्स म्हणतात प्रचंड प्रामाणिकता व करुणा असलेले श्रील प्रभुपाद हे खरे संत होते, ते ज्यांना ज्यांना भेटले त्यांना त्यांना त्यांनी प्रभावीत केले, त्यांनी कधीही कुणावर अधिकार गाजवला नाही आणि कुणाकडून आदराची अपेक्षाही केली नाही. (ISKON) त्यांनी जे काही सांगितले आणि केले ते केवळ श्रीकृष्णांसाठी. त्या पद्धतीने श्रील प्रभुपाद या संपूर्ण जगासाठी एक सुखाचा शांतीचा मार्ग समाजाला दिला.आणि इस्कॉन रावेत मंदिराच्या वतीने येत्या 20 ऑगस्ट रोजी त्यांची 126 वी जयंती ही साजरी करण्यात येत आहे .
हरेकृष्ण.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.