ISKON Ravet: श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त रावेतच्या इस्कॉन मंदिरामध्ये तीन दिवस उत्सव

एमपीसी न्यूज: श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त रावेतच्या इस्कॉन मंदिरामध्ये तीन दिवसांच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.(ISKON Ravet) दिनांक 18 19 आणि 20 ऑगस्टला हा उत्सव होणार असून 20 ऑगस्टला इस्कॉन चे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांची 126 वी जयंती साजरी करण्यात येणार आहे.

MPC News Podcast 18 August 2022: ऐका आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त रावेतच्या इस्कॉन मंदिरामध्ये तीन दिवसांच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.(ISKON Ravet) दिनांक 18 19 आणि 20 ऑगस्टला हा उत्सव होणार आहे. 18 ऑगस्टला दिवसभर सर्वांसाठी दर्शन खुले करण्यात येणार आहे. 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता श्री राधाकृष्ण यांचा अभिषेक, नैवेद्य आणि रात्री बारा वाजता महाआरती. तर 20 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते एक या वेळेमध्ये इस्कॉन चे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांची 126 वी जयंती साजरी करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.