Islamabad : आफ्रिदीच्या ‘All Time Worldcup Team’मध्ये विराटचा समावेश ; सचिन, इम्रान खानला डच्चू

एमपीसी न्यूज – पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी याने शुक्रवारी (दि.8) त्याचा ऑल टाईम वर्ल्ड कप संघ निवडला. त्याच्या या संघात महान फलंदाज सचिन तेंडूलकर आणि महान गोलंदाज इम्रान खान यांना स्थान मिळालेलं नाही. पण या संघात विराट कोहलीचा समावेश करण्यात आला आहे.

सचिन तेंडूलकर जगातील महान खेळाडू पैकी एक असून देखील आफ्रिदीने त्याच्या संघात सचिनला स्थान दिलेले नाही. एवढेच नव्हे तर पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान व 1992 मध्ये पाकिस्तानला विश्वचषक जिंकून देण्याऱ्या इम्रान खान यांना देखील त्यांने आपल्या संघात स्थान दिलेले नाही.

आफ्रिदीच्या या संघात सलामीची जबाबदारी पार पाडण्यासाठी माजी सहकारी सईद अन्वर आणि ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट यांना स्थान दिले आहे.

ऑस्ट्रेलियाचा यशस्वी माजी कर्णधार रिकी पाँटिंग व भारताचा कर्णधार विराट कोहलीला या संघात स्थान दिले आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने आफ्रिदीच्या संघात स्थान पटकावले आहे. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसला सुद्धा या संघात स्थान देण्यात आले आहे.

गोलंदाजी विभागात आफ्रिदीनं वसीम अक्रम, ग्लेन मॅकग्रा आणि शोएब अख्तर हे जलदगती गोलंदाज, तर शेन वॉर्न आणि सकलेन मुश्ताक या फिरकी गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.