Islamabad : वकार मास्तरांनी दिला शाहीद अफ्रिदी आणि गौतम गंभीरला सबुरीचा सल्ला

Islamabad: Waqar Younis advises Shahid Afridi and Gautam Gambhir to remain calm

एमपीसी न्यूज – माजी भारतीय सलामी फलंदाज गौतम गंभीर आणि माजी पाकिस्तानी खेळाडू शाहीद आफ्रिदी यांनी सोशल मीडियावरील वाक् युद्ध संपवून शांत राहण्याचा सल्ला पाकिस्तानी क्रिकेट संघाचा प्रशिक्षक वकार युनूस याने दिला आहे.

काही दिवसांपूर्वी शाहीद आफ्रिदी याने काश्मीरच्या मुद्द्यावर टिप्पणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. आफ्रिदीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. गौतम गंभीरने सुद्धा आफ्रिदीला सडेतोड उत्तर देत बांगलादेश युद्धाची आठवण करून दिली होती. त्यानंतर या वक्तव्याबद्दल भारतीय खेळाडूंनी आफ्रिदीला चांगलंच सुनावलं होतं.

मात्र, या प्रकरणी माजी पाकिस्तानी क्रिकेट संघाचा प्रशिक्षक वकार युनूसने मध्यस्थी करत दोघांनाही शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. वकार युनूस म्हणाला की, गंभीर आणि आफ्रिदीने सोशल मीडियावर भांडण्यापेक्षा जागतिक पातळीवर या बाबत सविस्तर चर्चा करावी. दोघेही हुशार आहेत. त्यामुळे थोडे धीराने घ्यावे, असा सबुरीचा सल्ला त्याने दिला आहे.

दोन्ही देशांत 2012-13 पासून कोणतीही मालिका खेळवली नसल्याचे वकार म्हणाले. दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी व क्रिकेट रसिकांना निराश न करता भारत- पाकिस्तान यांच्यात  क्रिकेट सामने खेळवले पाहिजेत. वकार पुढे म्हणाले की, आगामी काळात भारत-पाकिस्तानमध्ये सामने होतीलही, पण नक्की कुठे खेळवले जातील याबाबत माहिती नसल्याचे वकारने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.