Pune News : काय सांगता… इस्रो 2022 मानवरहित गगनयानचे पार्ट बनलेत वालचंदनगरमध्ये! 

एमपीसी न्यूज : इस्रो 2022 च्या सुमारास अवकाशात गगनयान सोडणार असून, भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेमध्ये वालचंदनगर कंपनीचा सहभाग आहे. गगनयानातील महत्त्वाच्या बुस्टरची निर्मिती वालचंदनगरमध्ये यशस्वीपणे करण्यात आली आहे. 

यापूर्वी मंगळावरील स्वारी, चांद्रयान एक, चांद्रयान दोन या मोहिमा पहिल्या आहेत. पण गगनयान हे यान मानवरहीत असणार आहे. भारताच्या पहिल्या मानवरहित यानाला आधुनिक यंत्रणा महाराष्ट्रातून मिळणार आहे. महाराष्ट्रातल्या पुण्यातील इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथे या यानाच्या पार्टची निर्मिती होणार आहे.

या मोहिमेचे नाव गगनयान ठेवण्यात आले आहे. या गगनयानाला उड्डाणासाठी लागणारे बुस्टर वालचंदनगर येथील कंपनीत तयार होणार आहे. बुस्टर म्हणजे काय तर यानाच्या जमिनीवरून अवकाशात उड्डाणासाठी जे इंधनाचा साठा असणारे आणि आग ओकणारे यंत्र म्हणजेच बुस्टर आहे.

गगनयान हा भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. गगनयानाच्या उड्डाणाला लागणारे बुस्टर पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर कंपनीत तयार आहेत. बुस्टर उभारणीबरोबर आता बुस्टरच्या गुणवत्ता चाचणीचाही प्रकल्प कंपनीने उभारला आहे. या गगनयानाच्या अंतिम प्रक्षेपणाच्या पूर्वीच्या सर्व चाचण्याही या कंपनीतच होणार आहेत. यासाठी चारमजली बुस्टर टेस्टिंग युनिट उभे केले आहे.

केवळ दीड वर्षात हा प्रकल्प कंपनीने उभारला आहे. महत्त्वाचे म्हणजे अशी क्षमता असणारी ही भारतातील पहिलीच कंपनी आहे. हा मानाचा तुरा पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात रोवला गेला आहे. गगनयान ही भारताची पहिली मानवरहित अंतराळ मोहीम आहे. 2020 मध्येच ही मोहीम राबवली जाणार होती, मात्र कोरोनाच्या संकटामुळे या मोहिमेचे प्रक्षेपण लांबले. या मोहिमेचे सर्व प्रकल्प पुन्हा सुरू केले आहेत.

मुख्य यानाबरोबर हे यान पाठवण्यासाठी जीएसएलव्ही मार्क 3 या भारताच्या हुबळी येथील प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे. विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटरचे निर्देशक एस सोमनाथ तसेच इस्रोच्या अनेक शात्रज्ञांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे उद्घाटन 18 डिसेंबरला झाले आहे.

अंतराळ मोहिमांच्या प्रक्षेपणादरम्यान एखादा अपघात झाल्यास अंतराळवीरांचे जीव वाचवण्यासाठी क्रूय एस्केप प्रणालीही कंपनीत तयार केली आहे. यानाचा स्फोट झाल्यास आपोआप या यंत्रणेमुळे यानाचा अंतराळवीर असणारा भाग हा यानापासून दूर होईल, हा प्रकल्प प्राथमिक स्तरावर असून, त्याचे कामही लवकर सुरू होणार आहे. देशाच्या अनेक अंतराळ मोहिमेत वालचंदनगर इंडस्ट्रीजचा मोठा वाटा आहे. चांद्रयान 2 नंतर आता गगनयान कंपनीने मोठा वाटा उचलला आहे. देशातील ही अशी यंत्रणा उभी करणारी पहिलीच कंपनी ठरली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.