Work From Home: आयटी, बीपीओ कंपनीचा ‘वर्क फ्रॉम होम’ कालावधी 31 डिसेंबरपर्यंत वाढवला

IT, BPO company's work from home period extended till 31st December मार्च महिन्यात कोरोना संसर्ग आणि कर्मचारी सुरक्षेचा विचार करून कंपन्यांनी 31 जुलैपर्यंत वर्क फ्रॉम होमची मुभा कर्मचाऱ्यांना दिली होती.

एमपीसी न्यूज – आयटी, बीपीओ कंपन्यांची वर्क फ्रॉम होमची मुदत 31 जुलैला संपत होती. आता हा कालावधी वाढवण्यात आला असून वर्क फ्रॉम होमची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारने याबाबत माहिती प्रसारित केली आहे.

भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने याबाबत असे ट्वीट केले आहे की, देशात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता. आयटी, बीपीओ कंपन्यांची वर्क फ्रॉम होमची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात येत आहे.

मार्च महिन्यात कोरोना संसर्ग आणि कर्मचारी सुरक्षेचा विचार करून कंपन्यांनी 31 जुलैपर्यंत वर्क फ्रॉम होमची मुभा कर्मचाऱ्यांना दिली होती.

देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. एकट्या महाराष्ट्रात आजवर 3,27,031 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 12 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 60 हजारांच्या घरात पोहोचली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.