Pune News : ज्ञानवापीचे लोण आता पुण्यातही, दोन मंदिराच्या जागी मशिदी उभारल्याचा दावा

एमपीसी न्यूज : उत्तर प्रदेशातील ज्ञानवापी मशीद परिसरात केलेल्या सर्वेक्षणात शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात आला आहे. सर्व मुस्लिम पक्षाकडून मात्र हा दावा फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं असतानाच आता ज्ञानवापीचे लोण पुण्यातही पसरले आहे.

सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातही दोन मंदिराच्या जागी मशिदी उभारण्यात आल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. आता त्या विरोधात लढा उभारण्यात येईल असे मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी सांगितले.

अजय शिंदे यांनी केलेल्या दाव्यानुसार, ज्ञानवापी प्रमाणेच पुण्यातही दोन मंदिराच्या जागी मशिदी उभारण्यात आल्या आहेत. पुणे शहरातील कसबा पेठ आणि नारायणेश्वर या दोन मंदिराच्या जागी या मशिदी मांडण्यात आले आहेत. छोटा शेख आणि बडा शेख यांच्या नावाने या ठिकाणी दर्गे उभारण्यात आले आहेत. या मंदिरांसाठी आता मनसे लढा उभारणार असल्याचं अजय शिंदे म्हणाले. यासाठी महापालिका आणि पुरातत्त्व विभागाला पत्र व्यवहार केला असल्याचेही त्यांनी सांगितलं.

त्यामुळे आगामी काळात पुणे शहरातही नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.