Alandi : स्वच्छतेची जबाबदारी ओळखून त्या पद्धतीने प्रत्येक नागरिकाने वागणे गरजेचे – कैलास केंद्रे
ओला सुखा कचरा वर्गीकरण करून तो कचरा घंटागाडी मध्येच टाकावा

एमपीसी न्यूज : नागरिकांनी स्वच्छते बद्दलची आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. स्वच्छ भारत किंवा स्वच्छतेची कल्पना,कार्य हे प्रत्येकाने स्वतः च्या घरापासून केल्यावर आपले घर व त्या जवळील परिसर , शहर सुंदर राहणार आहे. त्या अनुषंगाने आपली जबाबदारी ओळखून त्या पद्धतीने प्रत्येक नागरिकाने वागणे गरजेचे आहे. आपले घर, त्या जवळील परिसर व आपले शहर स्वच्छ राखावे असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले आहे.
Pimpri : शहरातील या भागाचा पाणीपुरवठा बंद
आळंदी (Alandi) येथील देहूफाटा जवळील श्री गजानन महाराज संस्थान समोर व त्या बाजूकडील इतर एक दोन ठिकाणी चेंबर लाईन तुंबुन तेथून पाणी देहूफाटा पर्यँत रस्त्यावर येत होते. याची दखल तत्काळ पालिकेने घेत कर्मचाऱ्यां मार्फत तेथील काम सुरू केले होते.