BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : समाजाला दृष्टी व आकार देण्याचे काम शिक्षकच करतात – आमदार चाबुकस्वार

एमपीसी  न्यूज –  तंत्रज्ञान वेगाने पुढे गेले तरी समाजाला आकार, दिशा व दृष्टी देण्याचे काम शिक्षकच खऱ्या अर्थाने करतात, असे मत आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी आज येथे केले.

दापोडी येथील प्रबोधन प्रतिष्ठान व इक्रा शिक्षण संस्थेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शंभर आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात आला. राज्य शासनाच्या ग्राहक संरक्षण विभागाचे सदस्य गोविंद पानसरे, प्रा. धनंजय लोखंडे, प्रा. प्रकाश सोनवणे, प्रबोधन प्रतिष्ठानचे प्रा. गोरख ब्राम्हणे, इक्रा शिक्षण संस्थेचे सलीम शेख आदी यावेळी उपस्थित होते.

आपल्या भाषणात गोविंद पानसरे म्हणाले की, शिक्षण ही प्राथमिकता असावी त्यानंतर प्रत्येकाने व्यवसायात उडी मारली पाहिजे व व्यवसायातून उन्नती घडविली पाहिजे, असे मत व्यक्त केले. यावेळी प्रा. सोनवणे, प्रा. लोखंडे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गोरख ब्राम्हणे यांनी तर आभार सलीम शेख यांनी आभार मानले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3