XI Admission CET : अकरावी प्रवेशाच्या सीईटी परिक्षेसाठी आज दुपारी 3 पासून पुन्हा अर्ज करता येणार 

एमपीसी न्यूज – दहावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. या सीईटी परिक्षेसाठी 20 जुलै पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती मात्र, 21जुलै रोजी तांत्रिक कारणास्तव अर्ज प्रक्रिया बंद करण्यात आली होती. आता सीईटी परिक्षेसाठी आज दुपारी 3 पासून (सोमवार, दि. 26) पुन्हा अर्ज करता येणार आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने रात्री उशिरा याबाबत निवेदन जाहीर केले. अकरावी सीईटी परिक्षेसाठी आज दुपारी तीन पासून पुन्हा ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहे.

https ://cet.11thadmission.org.in

या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येणार आहे. 02 ऑगस्ट रात्री बारा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येईल असे निवेदनात म्हटले आहे.

अर्जात खालील माहिती भरावी लागेल

ई-मेल आयडी (असल्यास)

पूर्वीचा मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे किंवा नव्याने नोंदविणे अनिवार्य आहे.

परीक्षेचे माध्यम, विद्यार्थ्याने सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांच्या प्रश्नांसाठी इंग्रजी माध्यम असेल. तथापि सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या विषयासाठी विद्यार्थ्यांस एक माध्यम निश्चित करावे लागेल.

सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यास त्याच्या तात्पुरत्या / कायमच्या निवासस्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा व तालुका / शहराचा विभाग (WARD) निश्चित करावा लागेल.

ज्या विद्यार्थ्यांनी दहावीचे आवेदनपत्र भरताना SEBC प्रवर्गाची नोंद केली आहे अशा विद्यार्थ्यांना शासनाच्या सुधारित तरतुदीनुसार खुला प्रवर्ग अथवा EWS हा प्रवर्ग निवडावा लागेल.

20 व 21 जुलै रोजी अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही मात्र, अर्ज प्रक्रिया अपूर्ण राहिलेल्या विद्यार्थ्यांना नव्यानं अर्ज करावा लागेल असे निवेदनात म्हटले आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.