Vision 3 Turbo : आयटेलचा ‘व्हिजन 3 टर्बो’ लॉन्च – 18 वॅटचे फास्ट चार्जिंग’ व ‘6 जीबी रॅम’ देणारा भारतातील पहिला स्मार्टफोन

एमपीसी न्यूज : नवीन फोन घ्यायचा आहे आणि तो पण बजेटमध्ये तर आयटेलने त्यांचा ‘व्हिजन 3 टर्बो’ (Vision 3 Turbo) हा फोन लॉन्च केला आहे. हा 18 वॅटचे फास्ट चार्जिंग व 6 जीबी रॅम देणारा भारतातील पहिला स्मार्ट फोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. शिवाय यांची किंमतही केवळ 7 हजार 699 रुपये म्हणजे 10 हजारांपेक्षा कमी किंमतीचा हा फोन आहे.

‘आयटेल’च्या ‘एसपी व्हिजन थ्रीजन थ्री’ या फ्लॅगशिप फोनला ग्राहकांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाल्यानंतर, ‘आयटेल’ने 3 जीबी + 3 जीबी टर्बो रॅमसह 18 वॅट फास्ट चार्जिंगसह प्रीमियम स्वरुपाचे, परवडणारे ‘एसपी व्हिजन 3 टर्बो’ हे मॉडेल सादर करून एक मोठी झेप घेतली आहे. या अधिक क्षमतेच्या रॅममुळे व फास्ट चार्जिंगमुळे मोबाईल गतीमान होणार असून, तसेच लवकर चार्ज झाल्यामुळे ग्राहकांना अखंडित सेवेचा उत्कृष्ट अनुभव मिळतो.

या नव्या फोनबद्दल बोलताना ‘आयटेल इंडिया’चे (Vision 3 Turbo) मुख्य कार्यकारी अधिकारी अरिजीत तलपात्रा म्हणाले की, “टियर-टू आणि त्याखालील श्रेणीच्या बाजारपेठांमधील ग्राहक नवीन तंत्रज्ञानाशी गुंतले जात आहेत. डेटाच्या वापरामध्ये प्रचंड वाढ होत असल्याचे आम्ही पाहत आहोत, तसेच मनोरंजनाचे प्राधान्यक्रम, त्याबद्दलच्या आवडीनिवडी, सवयी आणि माध्यमांविषयीची ग्रहणक्षमता यांतही बदल होत असल्याचे आमचे निरीक्षण आहे.

Vadgaon Maval : शेतीसह शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक प्रगती करा

बाजारपेठेतील भारतीय ग्राहकांच्या या बदलत्या सवयींशी सुसंगत राहण्याचा आम्ही आयटेलमध्ये प्रयत्न करीत आहोत. त्याकरीता आम्ही नावीन्यपूर्ण, ट्रेंडी वैशिष्ट्ये व भरपूर मूल्यवर्धन असलेली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परवडणाऱ्या किंमतीतील नेक्स्ट-जनरेशन उत्पादने आणत असतो. आमच्या या धोरणाचाच ‘व्हिजन 3 टर्बो’ हा परिणाम आहे, कारण हा स्मार्टफोन आमच्या ग्राहकांना प्रीमियम आणि उत्कृष्ट गुणवत्तेसह सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्ये देऊन त्यांच्या आकांक्षेला चालना देतो. बाजारपेठ आणि ग्राहकांविषयीच्या आमच्या अंतर्दृष्टीमुळे आम्हाला लहान शहरे, गावे व दुर्गम प्रदेश येथे राहणाऱ्या या पिढीच्या गरजा समजून घेण्यात मदत झाली आहे.”

“नवीन तंत्रज्ञानाने युक्त असा मोबाईल फोनची इच्छा बाळगणाऱ्या निमशहरी आणि ग्रामीण भागांतील ग्राहकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणे हे ‘व्हिजन 3 टर्बो’चे उद्दिष्ट आहे. आमचे वचन पूर्ण करण्यासाठी आम्ही ‘व्हिजन 3 टर्बो’सह अत्यंत समर्पणाने काम केले आहे. वाढवता येण्याजोगी टर्बो रॅम, रॉमची उच्च क्षमता, शक्तिशाली बॅटरी आणि मोठी स्क्रीन या गुणधर्मांमुळे हे उपकरण आमच्या ग्राहकांच्या तंत्रज्ञानाच्या आकांक्षा नक्कीच पूर्ण करेल,” असे तलपात्रा पुढे म्हणाले.

दुप्पट जास्त गती आणि कामगिरी यांचा अनुभव – Vision 3 Turbo

‘व्हिजन ३ टर्बो’ फोनमध्ये 3 जीबी + 3 जीबी अशी टर्बो रॅम आहे. यामुळे फोनची पॅसिव्ह मेमरी एकत्रित होऊन फोनचे कार्यान्वयन सुधारते आणि वापरकर्त्याला एक अतिशय सुरळीत अनुभव मिळतो. 18 वॅट फास्ट चार्जिंगच्या तंत्रज्ञानामुळे चार्जिंगचा वेळ लक्षणीयरीत्या 50 टक्क्यांपर्यंत कमी होतो. या किमतीच्या सेगमेंटमध्ये ही अशा प्रकारची पहिलीच ऑफर आहे. अगदी 20 मिनिटांच्या फ्लॅश चार्जमुळेदेखील या फोनमध्ये तब्बल ३ तासांचा टॉकटाइम मिळतो. ‘व्हिजन 3 टर्बो’मध्ये 64 जीबी रॉम आहे. तो 128 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांना त्यांचे आवडते चित्रपट, वेब सिरीज किंवा व्हिडिओ शूट करण्यासाठी पुरेशी जागा मिळते आणि त्यांना याबाबतीत तडजोड करावी लागत नाही. स्मार्ट फिंगरप्रिंट आणि फेस अनलॉक अशा दुहेरी सुरक्षा यंत्रणेमुळे वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेच्या समस्या दूर होतात व त्यामुळे हा फोन अद्वितीय आणि आकर्षक बनतो.

मोठ्या आणि चांगल्या स्मार्टफोनचा अनुभव

‘व्हिजन 3 टर्बो’ फोनमध्ये 5000 एमएएचची ‘इन-बिल्ट लिथियम-पॉलिमर’ बॅटरी आहे. यामध्ये ‘रिव्हर्स चार्जिंग’चीही सुविधा आहे. ‘इंटेलिजेंट पॉवर मॅनेजमेंटच्या’ सहाय्याने यातील अंगभूत ‘एआय पॉवर मास्टर’ बॅटरीचा बॅकअप 20 टक्क्यांनी वाढतो. ‘व्हिजन 3 टर्बो’मध्ये प्रीमियम 6.6 इंच एचडी+आयपीएस वॉटरड्रॉप डिस्प्ले आहे, जो शैली आणि कार्यक्षमता यांचे एकत्रित असे वैशिष्ट्य प्रदान करतो. या फोनची बॉडी 8.85 मिमी इतकी पातळ आहे आणि त्यामुळे फोन अगदी आकर्षक बनतो. स्टायलिश कॅमेरा डेको, परिपूर्ण भौमितिक पॅटर्न आणि स्पार्कलिंग फिनिश यांमुळे या स्मार्टफोनचे प्रीमियम आकर्षण आणखी वाढते. ‘मल्टी ग्रीन’, ‘जुएल ब्ल्यू’ आणि ‘डीप ओशन ब्ल्यू’ या तीन रंगांमध्ये ‘व्हिजन 3 टर्बो’ उपलब्ध आहे.

ग्राहकांना फोटोग्राफीचा उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी ‘व्हिजन ३’मध्ये ‘८ एमपी’चा ‘एआय ड्युअल रियर कॅमेरा’ आणि ‘5 एमपी’चा ‘सेल्फी कॅमेरा’ आहे. विस्तीर्ण लँडस्केप शूट करण्यासाठी, सभोवतालचे वातावरण अगदी सुस्पष्टपणे टिपण्यासाठी आणि वापरकर्त्याला फोटोग्राफीचा उत्तम अनुभव देण्यासाठी कॅमेऱ्याचे हे कॉन्फिगरेशन अगदी योग्य ठरते. ‘एआय ब्यूटी मोड’, ‘पोर्ट्रेट मोड’, ‘पॅनो मोड’, ‘प्रो मोड’, ‘लो लाईट मोड’ आणि ‘एचडीआर मोड’ यांनी हा कॅमेरा सुसज्ज आहे. स्मार्टपणे वस्तू ओळखण्यात, कॅमेरा इफेक्ट्सचे स्वयंचलित समायोजन करण्यात आणि तीक्ष्ण तपशीलांसह वस्तूचे फोटो काढण्यात या सर्व मोड्सचा उपयोग होतो. ‘एआय ब्यूटी मोड’मुळे 5 एमपीचा सेल्फी कॅमेरा हा अगदी कमी प्रकाश असलेल्या भागातही चमकदार आणि स्पष्ट सेल्फी काढू शकतो.

सर्व्हिसचे पाठबळ – Vision 3 Turbo

‘व्हिजन 3 टर्बो’ या फोनवर एकवेळ स्क्रीन रिप्लेसमेंट ऑफरसह सेवेची हमी देण्यात आली आहे. फोन खरेदी केल्यापासून 100 दिवसांच्या आत फोनची स्क्रीन खराब झाली अथवा तुटली, तर कोणत्याही खर्चाशिवाय किंवा शून्य किंमतीत ती एकदा बदलून घेण्याची सोय ग्राहकांना मिळू शकते. ‘कार्लकेअर’ हा ‘ट्रान्झिशन होल्डिंग्स’चा एकमेव सर्व्हिस ब्रँड आहे आणि त्याचे 1100 हून अधिक केंद्रांचे नेटवर्क आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.