ITI : आयटीआयमधील रोजगाराच्या संधीबाबत गुरुवारी कार्यशाळा

एमपीसी न्यूज –  आयटीआय विद्यार्थ्यांकरिता परदेशातील व्यावसायिक (ITI) शिक्षण व रोजगाराच्या संधीबाबत विद्यार्थी व पालकांसाठी कार्यशाळा दिनांक 16 मार्च 2023 दुपारी 2 ते 5.30 वाजेपर्यंत प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे ग्राड ड्रीम्स अर्थसेतू या संस्थेच्या माध्यमातून आयोजित केली आहे.

 

 

पिंपरी-चिंचवड महापालिका औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी यांच्या माध्यमातून येथील रहिवासी विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) ट्रेडस उत्तीर्ण केल्यानंतर (मनपा आयटीआय विद्यार्थ्यांना प्राधान्य)  परदेशातील उच्च शिक्षण (डिप्लोमा, डिग्री इ) घेता येईल. त्याद्वारे तेथील रोजगाराच्या संधी मुबलक प्रमाणात प्राप्त होतील. महापालिकेच्या सामाजिक विकास विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून उच्च शिक्षणाबाबत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल.

 

 

Pune News : बनावट पासपोर्टसह बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी तरुणाला अटक

 

 

 

 

तसेच विसा, lELTS इंग्लिश लैंग्वेज कोर्सेस इ. फी महानगरपालिका धोरणाच्या माध्यमातून देण्यात येईल. आयटीआयच्या विद्यार्थ्यांना परदेशातील अनेक विद्यापीठे’, कॉलेजेस, इन्स्टिट्यूट्स, आणि ट्रेनिंग देणाऱ्या संस्थांमध्ये वेगळ्यावेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. आयटीआय च्या सर्व ट्रेडस (इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोटिव्ह आणि इतर) मधील पुढील ऍडवान्सड कोर्सेस चा यात समावेश आहे.

 

 

पुढील काळात या विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील असे काही स्किल डेव्हलोपमेंट कोर्सेस, जसे की: आर्टिफिशीअल इंटेलिजन्स, ऑटोमेशन, कॅड / कॅम, इलेक्ट्रिकल वेहिकल मेन्टेनन्स अँड रिपेअर इ. कोर्सेस आयटीआय कॉलेज मध्येच करता येतील. तसेच जर्मनी, जपान, कॅनडा आणि इतर देशात उपलब्ध असणाऱ्या इंटर्नशिप बरोबर जॉब प्रोग्रॅम्स ना पण प्राधान्य दिले जाईल. यासाठी विद्यार्थ्यांना इंग्लिश टेस्ट (IELTS / PTE) पास करणे आवश्यक आहे. त्याचे ट्रेनिन्ग अर्थसेतू संस्थेमार्फत देण्यात येईल.

 

 

या नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे महानगरपालिकेचे सोशल ट्रान्सफॉर्मेशन चे उद्दिष्ट साध्य करण्यात येईल येथील नागरिकांचे विशेष करून युवक युवतींचे जीवनमान उंचावण्यास निश्चितच सहाय्य करण्यात येईल. याबाबत विद्यार्थी व पालकांसाठी कार्यशाळा दिनांक 16 मार्च 2023 दुपारी 2 ते 5.30 वाजेपर्यंत प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे ग्राड ड्रीम्स अर्थसेतू या संस्थेच्या माध्यमातून (ITI) आयोजित केली आहे.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.