Dr.Aparna Lalingkar : नासा, सिलिकॉन व्हॅलीत 30 टक्के भारतीय असणे ही अभिमानासह लाजिरवाणी बाब

एमपीसी न्यूज – नासामध्ये 30 टक्के भारतीय असणे तसेच सिलिकॉन व्हॅलीमध्ये 30 टक्के भारतीय असणे ही अभिमानाची बाब आहेच पण त्यासोबत लाजिरवाणी देखील आहे, असे मत डॉ. अपर्णा ललिंगकर (Dr.Aparna Lalingkar) यांनी व्यक्त केले.

फोरम फॉर इनोव्हेशन अँड अप्लिकेशन या संस्थेच्या सभेमध्ये त्या बोलत होत्या. रविवारी सावरकर भवन निगडी प्राधिकरण येथे हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी इनोव्हेशन सायकल कशी असते. त्याचे फायदे व दुष्परिणाम, आर्ट ऑफ इनोव्हेशन, त्यासाठी आवश्यक मार्केटिंग स्किल व समाजाभिमुख इनोव्हेशन या विषयी संकल्पना त्यांनी विशद केल्या.

आपल्या भारतातील टॅलेंट हे भारतात राहणे व आपल्या देशासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. आपल्या देशातील पालकांनी माझा पाल्य हा परदेशात नोकरी करतो हे अभिमानाने सांगणे बंद केले पाहिजे. यासाठी त्यांनी इस्रायल या देशाचे उदाहरण देऊन त्या म्हणाल्या कि आकाराने केरळ एवढा देश असूनही तिथे शालेय अभ्यासात इनोव्हेशनचा समावेश आहे. आज जगातील सर्वात जास्त स्टार्ट अप इस्रायलमध्ये (Dr.Aparna Lalingkar) आहेत.

Ophthalmology camp : डाॅ. लक्ष्मण कार्ले यांच्या नेत्रचिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद 

सुधारित नवी धोरणे व सरकारी इच्छाशक्ती याच्या जोरावर भारताचा तिसरा क्रमांक लागतो. कम्युनिकेशन स्किल, क्रिएटिव्ह थिंकिंग, धोरण निश्चिती, सतत मोटिव्हेट रहाणे व जोखीम पत्करायला शिकणे या प्रमुख बाबींवर त्यांनी आपले विचार मांडले.

डॉ. अपर्णा ललिंगकर (Dr.Aparna Lalingkar) या अक्षरब्रह्म या संस्थेच्या संचालिका आहेत. तसेच माहिती तंत्रज्ञान विषयात त्यांनी पी. एच. डी. केली आहे. 15 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय शोधनिबंध त्यांनी आजवर प्रकशित केले आहेत. रस्त्यावरील प्रदूषण या विषयावर संशोधन करणारे सिद्धार्थ कदम यांना फिन्याप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. अपर्णा ललिंगकर यांच्या हस्ते कदम यांना शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी फिन्यापचे अध्यक्ष अविनाश देशमुख, चिन्मय कवी, चंदन पाटील व सर्व सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन सारंग पापळकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.