Pune News : ठरलं… पीफ महोत्सव 2 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान होणार ;72 देशांचा सहभाग

एमपीसी न्यूज –  जानेवारी महिन्यात नियोजीत असलेला ‘पीफ महोत्सव’  ‘जी 20’ च्या तयारीसाठी पुढे ढकलण्यात आला होता.  पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन ( Pune News ) यांच्या संयुक्त विद्यमाने 21 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पीफ) आता 2 ते 9 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला असल्याची घोषणा, फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज (मंगळवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत केली. यावर्षी महोत्सवासाठी 72 देशांमधून 1 हजार 574  इतके चित्रपट आले असून त्यापैकी 140 चित्रपट दाखविले जाणार असल्याची माहितीही पटेल यांनी दिली.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळचे व्यवस्थापकीय संचालक डॉ अविनाश ढाकणे आणि चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते, पुणे फिल्म फाउंडेशन विश्वस्त सबिना संघवी, सतीश आळेकर, मोहन आगाशे आणि महोत्सवाच्या ( Pune News ) चित्रपट निवड समितीचे सदस्य अभिजित रणदिवे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

Pimpri News: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी महोत्सव हा केवळ चित्रपटगृहात अर्थात ऑफलाईन पद्धतीने होणार असून यावर्षीच्या महोत्सव पाहण्यासाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया गुरुवार (दि.5) रोजी www.piffindia.com या महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावरून होणार आहे तर चित्रपटगृहांबाहेरील स्पॉट नोंदणी प्रक्रिया ही 19  जानेवारी पासून सुरू होणार आहे. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन, कॅम्प परिसरातील आयनॉक्स व लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय (एनएफएआय) या तीन ठिकाणी एकूण 9 पडद्यांवर महोत्सवाअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या चित्रपटांचे प्रदर्शन ( Pune News ) करण्यात येणार असल्याचेही पटेल यांनी यावेळी नमूद केले.

सर्वसामान्य रसिक प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहात ( Pune News )  चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण महोत्सवासाठीचे नोंदणी शुल्क 800 रुपये इतके असून ज्येष्ठ नागरिक, चित्रपट क्लब सदस्य व विद्यार्थी यांसाठी हे शुल्क 600 रुपये असणार आहे.

महोत्सवासाठी निवड झालेल्या व जागतिक स्पर्धा विभागात 14 चित्रपटांची घोषणा देखील या वेळी करण्यात आली.

21 व्या पिफसाठी जागतिक स्पर्धा विभागात निवड झालेले चित्रपट पुढीलप्रमाणे –

क्लॉन्डाईक (दिग्दर्शक – मेरीयन एर गोर्बेक, युक्रेन, टर्की)

परफेक्ट नंबर (दिग्दर्शक – क्रिस्तोफ झानुसी, पोलंड)

थ्री थाऊजंड नंबर्ड पिसेस (दिग्दर्शक – ऍडम चाशी, हंगेरी)

द ब्लू काफ्तान (दिग्दर्शक – मरियम तजनी, मोरोक्को, फ्रांस, बेल्जियम, डेन्मार्क)

मेडीटेरियन फिव्हर (दिग्दर्शक – महा हाज, पॅलेस्टीन, जर्मनी, फ्रांस, कतार)

एविकष्ण (दिग्दर्शक – मेट फजॅक्स, हंगेरी)

मिन्स्क (दिग्दर्शक – बोरिस गट्स, एस्टोनिया)

वर्ड (दिग्दर्शक – बीएता पाकानोव्हा, चेक रिपब्लिक, स्लोव्हाकिया, पोलंड)

बटरफ्लाय व्हिजन (दिग्दर्शक – मॅक्सिम नकोनेखनी, युक्रेन, क्रोशिया, स्वीडन, चेक रिपब्लिक)

तोरी अँड लोकिता (दिग्दर्शक – जीन-पेरे अँड ल्युक दादेन, बेल्जियम, फ्रांस)

अवर ब्रदर्स (दिग्दर्शक- रशीद बुशारब, फ्रांस)

व्हाईट डॉग (दिग्दर्शक – अनायस बाहबुह – लाव्हलेट, कॅनडा)

बॉय फ्रॉम हेवन (दिग्दर्शक – तारिक सालेह, स्वीडन, फिनलँड, फ्रांस, डेन्मार्क)

हदिनेलेंतू (दिग्दर्शक – प्रीथ्वी कोनानूर, भारत)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.