Chinchwad : चिंचवडला रंगणार जे.आर.डी. टाटा उद्योग पुरस्कार सोहळा

एमपीसी न्यूज –   महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्यावतीने जे. आर. डी. टाटा उद्योग पुरस्कार वितरण बुधवार दि. 24 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी दिली.

चिंचवड येथील ऑटोक्लस्टरमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा सायंकाळी चार वाजता होणार आहे. यावेळी ज्येष्ठ  व्यवस्थापनतज्ञ डॉ.  प्र.चि. शेजवलकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहे. पुरस्कार वितरण उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी टाटा मोटर्सचे भूतपूर्व महाव्यवस्थापक मनोहर पारळकर उपस्थित राहणार आहेत.

बीव्हीजी ग्रुपचे हनुमंत गायकवाड यांना उद्योगरत्न, क्वॉलिटी स्टीलचे संचालक सूर्यप्रकाश केडिया यांना उद्योगविभूषण, ,सौरभ एन्टरप्रायझेसचे मच्छिंद्र कराळे यांना उद्योगभूषण, योगेश एन्टरप्रायझेसच्या कविता भोगाळे यांना उद्योगसखी, जातेगावचे प्रगतशील शेतकरी साहेबराव सातपुते यांना कृषी उद्योग, विश्व इंजिनिअरिंगचे हर्षद मगर यांना युवा उद्योजक, बाबासाहेब निमत यांना उद्योगमित्र पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.