PCMC News : ‘जॅकवेल’ ठेकेदार नागपुरात अपात्र, पिंपरीत पात्र; फौजदारी कारवाई करा – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज – भामा आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी बांधावयाच्या जॅकवेल निविदा प्रकरणातील ठेकेदार कंपनी गोंडवाना इंजि. ही ब्लॅकलिस्टेड असल्यामुळे नागपूर स्मार्ट सिटीच्या कामात अपात्र ठरलेली असातना ती पिंपरी-चिंचवड महापालिकेत मात्र पात्र ठरली आहे.(PCMC News) खोटी माहिती देऊन महापालिकेची फसवणूक केल्या प्रकरणी या ठेकेदार कंपनीवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी त्याबाबत तत्काळ कारवाई करण्याची विनंती गव्हाणे यांनी केली आहे. भामा आसखेड जॅकवेलच्या कामात होत असलेल्या या 30 कोटी रुपयांच्या लूट प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसने आयुक्त सिंह यांना आठवड्यापूर्वी निवेदन दिले होते. त्यानंतरही महापालिका प्रशासन कोणतीच कारवाई करण्याच्या मनस्थित नसल्याने गव्हाणे यांनी या प्रकरणाच्या कागदपत्रांची माहिती घेत नवीन गफला समोर आणला आहे. संबंधीत ठेकेदाराने महापालिकेला कशा प्रकारे फसविले आहे, याचे पुराव्यासह दाखले गव्हाणे यांनी दिले.

Pune News: पाण्याच्या वापराबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे – डॉ. सुहास वाणी

ठेकेदाराने महत्वाची माहिती लपवली आणि त्याची कुठेही वाच्यता न करता सल्लागारानेही महापालिकेला गंडवल्याचे आता समोर आले आहे. (PCMC News) नागपूर स्मार्ट सिटी कामात जुलै 2022 मध्ये या ठेकेदार कंपनीला निविदा भरण्यास अपात्र ठरविण्यात आले. या अपात्रतेच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले. मध्य प्रदेश सरकारच्या पेयजल योजनेत याच गोंडवाना इंजि. या ठेकेदार कंपनीने अत्यंत निकृष्ठ दर्जाचे काम केल्याने त्यांना ब्लॅकलिस्टेड केल्याची माहिती लपविली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भामा आसखेड जॅकवेल कामात याच गोंडवाना इंजि. कंपीनीने ती पूर्वीची माहिती दडविली. महापालिकेच्या संबंधीत अधिकाऱ्यांनी त्याबाबत कुठली शहनीशा केलेली नाही आणि ठकेदार इथे पात्र ठरला. गोंडवाना इंजि. कपनीने भामा आसखेड जॅकवेल कामासाठी (PCMC News) मूळ 121 कोटींची निविदा थेट 167 कोटी रुपयांची भरली होती. प्रशासनाने दर कमी करण्याची विनंती केल्यावर ती 151 कोटींपर्यंत खाली घेतली. त्यामुळे 30 कोटी रुपये जादा दराने ही निविदा देण्यात येणार असून ती मोठी लूट असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने आयुक्त  सिंह यांच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, महापालिकेची फसवणूक केल्याच्या प्रकरणात गोंडवाना इंजि. कंपनी आणि जबाबदार असणाऱ्या सर्व संबंधितांवर आता प्रशासकीय आणि फौजदारी कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अजित गव्हाणे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.