Pune : भामा-आसखेड धरणातील जॅकवेल व पंप हाऊसच्या कामाची पाहणी

एमपीसी न्यूज – भामा-आसखेड धरणातील जॅकवेल व पंप हाऊसच्या कामाची पाहणी करण्यात आली. या ठिकाणी इनटेक चॅनलच्या अंडरवॉटर खोदाईच्या कामाचा आढावा घेऊन हे काम ३० जुलैपूर्वी पूर्ण करण्याचे व उर्वरित फिनिशिंगचे काम केबल डक्ट बांधणे इलेक्ट्रॉनिक स्विचयार्ड स्टेशन यासंबंधीची कामे 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करून ३० सप्टेंबरपर्यंत जॅकवेल कार्यान्वित करण्याचे व पूर्ण कामाचा तपशील अहवाल सादर करण्याचे आदेश राव यांनी दिले. 

पुणे महानगरपालिकेच्या भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी आयुक्त सौरभ राव यांनी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त बिपीन शर्मा पाणी पुरवठा प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, अधीक्षक अभियंता पाणीपुरवठा प्रवीण गेडाम व संबधित अधिकारी उपस्थित होते.

तळेगाव एमआयडीसी ते जॅकवेल यामधील हायटेंशन केबल टाकण्याच्या कामाचे पाहणी करण्यात अली. सदर ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे सदर कामा सोबत सुमारे 7 किमी केबल टाकण्याचे काम सप्टेंबर 2019 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला  महापालिका आयुक्तांनी दिला. त्यानंतर  तसेच पाइपलाइनचे काम माहिती घेऊन स्थगित ठेवलेल्या एक किमी लांबीचे व इतर पाईप लाईन कामा  31 ऑक्‍टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड हद्दीतील कामाच्या संदर्भात बैठक घेऊन परवानगी मिळण्याबाबत खात्याचा पाठपुरावा करण्याचे आदेश देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like