Maval : जाधववाडी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी बाळा भेगडे यांचे बैलपोळा साजरा करत मानले आभार

एमपीसी न्यूज – जाधववाडी प्रकल्पबाधित शेतक-यांनी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांचे बैलपोळा साजरा करत आभार मानले. बैलपोळ्यानिमित्त सजवण्यात आलेल्या बैलांच्या अंगावर गुलाबी रंगाने संदेश लिहून धन्यवाद देण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील जाधववाडी लघुपाटबंधारे प्रकल्पांतर्गत उपसा सिंचनाखालील इंद्रायणी नदीच्या तिरावरील कान्हेवाडी, सांगुर्डी, येलवाडी, इंदोरी आणि खालुंब्रे या पाच गावांना प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातून वगळण्यात आले आहे. पाच गावांतील शेतकऱ्यांना अखेर राज्यमंत्री संजय(बाळा) भेगडे यांच्यामुळे 22 वर्षानंतर न्याय मिळाला आहे.

शेतकरी बांधव त्याची शेतजमीन पुन्हा 22 वर्षानंतर बैलनांगर याचं औत करून कसणार आहे. त्यांना त्यांची शेतजमीन मिळवून दिल्याबद्दल बैलपोळा सणानिमित्त बैलांना सजवून बाळा भेगडे यांचे आभार मानून शेतक-यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1