Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे जगदगुरू संत तुकाराम महाराज बीज सोहोळा संपन्न

एमपीसी न्यूज : जगदगुरू संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त शाळा चौकातील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

मंदिरात सकाळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे व रोटरी क्लब आॅफ तळेगाव एमआयडीसीच्या अध्यक्षा रजनीगंधा खांडगे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची महापूजा आणि अभिषेक करण्यात आला. तसेच संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

मंदिरात भजन, किर्तन, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीविठ्ठल मंदिर संस्थानचे विश्वस्त सुरेशभाई शहा, हभप ज्ञानेश्वर महाराज दाभाडे यांच्या हस्ते श्री खांडगे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कोरोनाच्या नियमांचे पालन करून धार्मिक विधी पार पडले. मंदिरातील पुजारी अतुलकाका रेडे, आप्पा शिरूरे व भजनक-यांनी कार्यक्रम यशस्वी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.