BNR-HDR-TOP-Mobile

Pune : जगदीश मुळीक हा कोणत्याही गटाचा नाही – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज –  जगदीश मुळीक हा कोणत्याही गटाचा नाही, असेच काम कर, हा तुला इशारा आहे, चांगले काम कर, असे सांगत जगदीश मुळीक यांना खूप खूप शुभेच्छा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.  जगदीश मुळीक यांची आज पुणे कार्यकर्ता मेळाव्यात शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. 

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, पुणे हे पवारांचे, नंतर कलमाडींचे आणि आता भाजपचे. मात्र भाजपचे पुणे निर्माण करण्यासाठी बापट यांनी खूप कष्ट घेतले. 33 टक्के महिला भाजपमध्ये विविध कार्यकारिणीवर असल्या पाहिजे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा माधुरी मिसाळ यांनी अध्यक्षपद सांभाळले. पर्वती मतदारसंघात त्या 33 हजार मताधिक्याने निवडून आल्या. संजयनाना, बापट, माधूरीताई या तिघांच्या नावाखाली भाजपला पुढे जायचे आहे, असे पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

राजेश पांडे, संपर्क प्रमुख गणेश बिडकर, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेता धीरज घाटे, माजी खासदार अनिल शिरोळे, माजी सभागृह नेता श्रीनाथ भिमाले यांचे 12 – 13 ची कोअर टीम असेल.

पाटील पुढे म्हणाले, राज्यात सर्वच एकत्र येऊन आपल्याला संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. महापालिकांनी नीट काम करावे. नेहमी जमिनीवर पाय ठेवून काम करावे. 60 ते 70 ठिकाणी आपला आमदार विजयी होतोच. महाराष्ट्रात 23 शहरात सत्ता आणण्याची धम्मक आहे.

माझी एक पतसंस्था, सूतगिरणी नाही, म्हणून तुम्हाला सहकार कारण तुमचा इंटरेस्ट नसेल, असे अमित भाईंनी मला सांगितले. यावेळी पाटील यांनी अजित पवार यांचे किती कारखाने आहेत माहित नाही ते बापट यांना माहिती असेल, तसेच महाराष्ट्रात सर्वात हुशार मंत्री जयंत पाटील, असाही टोला त्यांनी राष्ट्रवादीला लगावला.

तर फ्लेक्स लावताना मोदीजी छोटे व नगरसेवकाचा फोटो मोठा असा बदल होण्याची गरज आहे. जगदीश मुळीक यांना बळ द्या, असे आवाहन कार्यकर्त्यांना चंद्रकांत पाटील यांनी केले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like