“Jaggu aani Juliet” : कोळीवाड्यातला जग्गू आणि अमेरिकन जुलिएटची भन्नाट लव्हस्टोरी!

एमपीसी न्यूज : कोळीवाड्यातला जग्गू आणि अमेरिकेची जुलिएट एकत्र धमाल करत आहेत हे आपण मोशन पोस्टरमध्ये बघितलंच! मात्र या दोघांसोबत आणखी (Jaggu aani Juliet) कोण कोण जग्गू आणि जुलिएटमध्ये धमाल करायला असेल याचं कोडं आता उलगडलं आहे. चित्रपटाच्या मोशन पोस्टरला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आज (ता. 9) या चित्रपटाचं टीझर रिलीज झालं आहे, आणि या टीझरलाही तूफान प्रेम मिळतंय.

पुनित बालन स्टुडिओज् निर्मित ‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटात अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी हे मुख्य भूमिकेत आहेत, हे आपल्याला मोशन पोस्टरमधून समजलंच होतं. मात्र टीझरवरून असं दिसतंय की, या चित्रपटात कलाकारांची मोठी फौज धमाल करण्यासाठी आणि प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. कोळीवाड्याचा लाडका जगदीश उर्फ जग्गू आणि अमेरिकेतल्या चितळ्यांची इंग्रजाळलेली जुलिएट यांच्या भन्नाट प्रेमकथेची गोष्ट सांगणारा हा चित्रपट आहे. उत्तराखंडात रंगणारी ही लव्हस्टोरी आपल्याला हृषिकेश जोशी सांगतात.

Pimpri News : स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन 

दोन भिन्न स्वभावाच्या आणि समाजाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून आलेले जग्गू आणि जुलिएट एकमेकांच्या कसे प्रेमात पडतात, त्यांच्या प्रेमात रंग भरण्यासाठी इतर पात्रं काय काय करामती करतात आणि या सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी गंगा नदी आणि देवभूमी उत्तराखंडातील नयनरम्य दृश्य या सगळ्यामुळे चित्रपटाचा टीझर भन्नाट झाला आहे. जग्गू-जुलिएटचं काय होतं, ते एकत्रं येतात की नाही याची उत्सुकता (Jaggu aani Juliet) टीझर बघून नक्कीच वाढली आहे.अभिनेता अमेय वाघची नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळ्या ढंगाची भूमिका या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे. त्याच्या अतरंगी संवादामुळे त्याची भूमिका बहारदार दिसत आहे. तसेच वैदेही परशुरामीने पुन्हा एकदा कलरफुल दिसत, आपल्या हास्याने प्रेक्षकांची मनं पुन्हा एकदा घायाळ केली आहेत. तर अजय-अतुल या जोडीची वेगवेगळ्या जॉनरची गाणी आपल्याला या चित्रपटात बघायला मिळतील.

अमेय-वैदेहीसोबतच हृषिकेश जोशी, उपेंद्र लिमये, प्रविण तरडे, मनोज जोशी, समीर धर्माधिकारी, समीर चौगुले, अविनाश नारकर, सुनिल अभ्यंकर, सविता मालपेकर, रेणूका दफ्तरदार, अभिज्ञा भावे, अंगद म्हसकर, जयवंत वाडकर, केयुरी शाह अशा जबरदस्त कलाकारांची फौज चित्रपटात दिसत आहे, त्यामुळे मल्टिस्टारर चित्रपटाचा आनंद प्रेक्षकांना पुन्हा एकदा मिळणार आहे.

‘पुनीत बालन स्टुडिओज्’ने यापूर्वी निर्मिती केलेला सामाजिक विषयावरील ‘मुळशी पॅटर्न’च्या सुपरहिट यशानंतर आता ‘जग्गू आणि जुलिएट’च्या रूपात नवीकोरी रोमँटिक लव्हस्टोरी प्रदर्शित होत आहे. पुनीत बालन स्टुडिओज् निर्मित, अजय-अतुल म्युझिकल आणि महेश लिमये यांच्या दिग्दर्शनाची आणि कॅमेऱ्याची जादू दाखवणारा ‘जग्गू आणि जुलिएट’ 10 फेब्रुवारी रोजी आपल्या भेटीस येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.