Respectable Work: जागृती सोशल फाउंडेशनने आजवर दिले शंभर व्यक्तींना दृष्टीदान

Jagruti Social Foundation has given sight to hundreds of people till date वर्षातून किमान दोन अंध व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचा प्रयत्न करु या विचाराने 17 ऑगस्ट 2010 रोजी जागृती सोशल फाउंडेशनची स्थापना झाली.

एमपीसी न्यूज- ‘जीवनभर रक्तदान, मृत्यूनंतर नेत्रदान’ हे ब्रीदवाक्य घेऊन वाटचाल करणा-या जागृती सोशल फाउंडेशनच्या वतीने आजवर 66 नेत्रदान करण्यात आले असून यामुळे सुमारे 100 व्यक्तींना दृष्टी लाभली आहे. वर्षातून किमान दोन अंध व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचा प्रयत्न करु या विचाराने 17 ऑगस्ट 2010 रोजी जागृती सोशल फाउंडेशनची स्थापना झाली.

अतुल घाटगे यांनी आपले वडील दिवंगत दिलीप घाटगे यांचे मरणोत्तर नेत्रदान करुन एक चांगला पायंडा सुरु केला. जागृती सोशल फाउंडेशनचे सर्व सदस्यांचे अपार कष्ट आणि सर्व नेत्रदात्यांच्या सहकार्यामुळे मागील दहा वर्षांच्या वाटचालीत आजवर 66 नेत्रदान करुन 100 अंध व्यक्तींच्या जीवनात प्रकाश आणण्याचे मोलाचे काम करण्यात आले आहे.

नुकतेच निधन पावलेले गोविंद परशुराम खवणेकर यांचे नेत्र दान करुन त्यांच्या कुटुंबाने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. हे संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेले 66 वे नेत्रदान आहे.

गोविंद परशुराम खवणेकर

खवणेकर यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. त्यावेळी संस्थेचे हितचिंतक महेश लाकाळ तेथे उपस्थित होते. त्यांनी खवणेकर यांचे चिरंजीव दत्तप्रसाद खवणेकर व कन्या दीपाली नाईक यांच्याशी चर्चा करुन त्वरीत नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला.

तसेच हेमंत गवांडे यांच्यावतीने संस्थेशी संपर्क करुन बिर्ला हॉस्पिटलचे डॉ. रामदास यांच्या मार्फत नेत्रदान करण्यात आले. यापूर्वी महेश लाकाळ यांनी आईचे नेत्रदान केलेले आहे.

नेत्रदानाबरोबर संस्थेच्या वतीने वारक-यांना आयड्रॉप्स देणे, प्रथमोपचार करणे, वेळोवेळी रक्तदान आणि प्लेटलेटस दान असे अनेक उपक्रम राबवण्यात येतात. तसेच उस्मानाबाद येथील 1100 कुटुंबांना दुष्काळाच्या वेळी धान्यवाटप करण्यात आले.

तसेच आळंदी येथे दोन अंध जोडप्यांचा विवाह करण्यात आला. या सर्व उपक्रमात संस्थेच्या वतीने राम फुगे, नीलेश धावडे, नितीन शिंदे, डॉ. अनिल काळे, विश्वास काशीद, अविनाश फुगे, दिनेश लांडगे, स्वप्निल फुगे, अक्षय तापकीर, सागर माळी, पराग कुंकुलोळ, कविता स्वामी, विनय पाटील, सौरभ घारे, राहुल खाचणे, संतोष नवलाखा, संजय शिंदे, संजय बेंड, सुहास भाकरे, राजू दौंडकर, नीलेश पाटील आणि शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांचा मोलाचा सहभाग असतो. मात्र ख-या अर्थाने संस्थेच्या यशाचे खरे मानकरी हे सर्व नेत्रदात्यांचे कुटुंबीय आहेत अशीच सर्वांची भावना आहे.

नेत्रदानाच्या चळवळीत खूप मोठ्या प्रमाणावर लोकसहभागाची गरज आहे. त्यामुळे ज्या व्यक्ती नेत्रदानासाठी पुढे येऊ इच्छितात त्यांनी संस्थेच्या माध्यमातून संस्थापक राम फुगे यांच्याशी 9011020690 या क्रमांकावर अवश्य संपर्क करावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.