Jaisingrao Gaikwad Quits BJP : भाजप नेते जयसिंगराव गायकवाड यांचा पक्षाला रामराम

0

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. खडसे यांच्यानंतर भाजपला हा दुसरा धक्का मानला जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्र पाठवून आपल्याला पक्षात योग्य तो सन्मान मिळत नसल्याची खंत व्यक्त करत गायकवाड यांनी पदाचा राजीनामा दिला.

राजीनाम्यासाठी भाजपमध्ये उपेक्षा होत असल्याचे कारण त्यांनी पुढे केले आहे सांगितले. त्यामुळे पदवीधर निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे नाराज झालेल्या जयसिंगराव गायकवाड यांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, आता जयसिंगराव यांनी हा उमेदवारी अर्ज मागे घेणार असले तरी त्यांनी पक्षालाच रामराम ठोकला आहे.

जयसिंगराव गायकवाड मराठवाड्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. यापूर्वी त्यांनी केंद्र आणि राज्यात काम केले आहे. जयसिंगराव गायकवाड यांनी सुरुवातीपासून मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह धरला होता. हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे खेचून आणायचा असेल तर मला उमेदवारी द्यावी, असे त्यांनी म्हटले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावरून ‘प्रयोग थांबवा, काकांना उमेदवारी द्या’अशी मागणी केली जात होती.

जयसिंगराव गायकवाड यांना मानणारा मोठा वर्ग मराठवाड्यात आहे. त्यांनी दोनवेळा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्त्व केले आहे. गेल्या काही वर्षांपासून जयसिंगराव गायकवाड सक्रिय राजकारणापासून दूर होते. मात्र, आता त्यांनी पुन्हा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III