Talegaon Dabhade : धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जल समाधी आंदोलन 

एमपीसी न्यूज :  धनगड आणि धनगर एकच असल्याने याबाबत दुरुस्ती  करून धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू करावे. तसेच  मेंढपाळांवर होणारे हल्ले थांबावेत. या मागणीसाठी मल्हार सेना मावळ आणि समस्त धनगर समाज मावळ तालुका यांच्या वतीने तळे शंकराच्या मंदिरा जवळ गुरुवारी (दि 22) सायंकाळी अर्ध जल समाधी आंदोलन  छेडण्यात आले.

लोकप्रतिनिधी आणि शासनाने या सनदशीर आणि लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनाची दखल घेतली नाही. तर निवडणुकींवर बहिष्कार घालण्याचा इशारा यावेळी सरकारला देण्यात आला.  या आंदोलनाला मल्हार सेनेचे संस्थापक सरसेनापती लहुजी शेवाळे, मल्हार सेना मावळ तालुक्याचे अध्यक्ष रामजी कोळेकर, रवींद्र कोकाटे, बापुसाहेब गुंजाळ,  रंगनाथ कुलाळ,  दर्शन गुंड  आदी उपस्थित होते.

केंद्रातील ओबीसी आणि राज्यातील एनटीच्या मध्यात फसलेला धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ आहे. त्यांनाही आरक्षण द्यावे.या अर्धजल समाधी आंदोलनाची दखल घेतली गेली नाही तर यापुढे  जलसमाधी आंदोलन छेडले जाईल, असा  इशारा दर्शन गुंड यांनी दिला.

धनगर समाजाला न्याय मिळाला नाही तर आगामी सर्व निवडणुकींवर बहिष्कार घालण्याचा इशारा जेष्ठ कामगार नेते सतीश पारखे यांनी दिला.यावेळी रामजी कोळेकर, रवींद्र कोकाटे, प्रा.मोहन कडू, विजय सरक यांनी धनगर समाज्याच्या व्यथा मांडल्या. यावेळी जोरदार घोषणा बाजी करण्यात अली. संघटनेचे अशोक माने,जयवंत शेळके, गौरव कोकाटे, हभप बापूसाहेब गुंजाळ, अमोल ठोंबरे, विक्रांत गोवेकर, बाबूराव शेडगे, यांची भाषणे झाली. दर्शन गुंड यांनी सूत्रसंचालन केले. रविंद्र कोकाटे यांनी आभार  मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.