Jalna raid: जालन्यामधील स्टील उद्योजकाच्या कारखान्यावर छापा, सुमारे 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त

एमपीसी न्यूज: जालन्यामध्ये आयकर विभागाने लोखंडी गज उत्पादन करणाऱ्या कारखानदारांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यामध्ये आयकर विभागाच्या हातात मोठे घबाड लागले आहे. (Jalna raid) तब्बल 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता समोर आली आहे. यात 58 कोटींची रोख रक्कम, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरेसह 16 कोटींचा ऐवज सापडला आहे. एवढंच नाहीतर 300 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रही सापडली आहे.

 

जालन्यात आयकर विभागाने मोठी धाड टाकली. मागील 1 ऑगस्टपासून हे धाड सत्र सुरू होते. तब्बल 8 दिवस ही कारवाई चालली. (Jalna raid) आयकर विभागाचे अधिकारी वेगवेगळ्या पथकां मार्फत एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. आयकर विभागाने नवीन एमआयडीसी मधील 3 रोलिंग मिल आणि त्यांच्याशी निगडित आर्थिक व्यवहारांची तपासणी केली. यामध्ये औरंगाबादमधील एका प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे. या कारवाईमध्ये तब्बल 390 कोटींची रोकड हाती लागली. ही रोकड मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना तब्बल 16 तास लागले.

Pimpri News: हमारे पिंपरी मे ” कराची ” का क्या काम है ? अपना वतन चा सवाल 

जालन्यातील या चार बड्या स्टील कारखानदारांनी कोट्यवधी रुपयांचे जादा उत्पन्न व्यवहारातून मिळवले आणि हे व्यवहार रोखीत केले, याची माहिती रेकॉर्डवर आणली नाही. त्यामुळे आयकर विभागाने अत्यंत गुप्तपद्धतीने हा छापा टाकला.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.