Jambhul gaon: जांभूळ गावच्या उपसरपंचपदी स्नेहल प्रशांत ओव्हाळ बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ – जांभूळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत(Jambhul gaon) स्नेहल प्रशांत ओव्हाळ यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायतीच्या मावळत्या उपसरपंच कल्पना बाळासाहेब काकरे यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

 

त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी सरपंच नागेश ओव्हाळ यांच्या (Jambhul gaon)अध्यक्ष्यतेखाली बुधवारी निवडणूक घेण्यात आली. या वेळी उपसरपंचपदासाठी स्नेहल प्रशांत ओव्हाळ यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. एकमेव अर्ज आल्यामुळे स्नेहल प्रशांत ओव्हाळ यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

LokSabha Elections 2024 : अधिकारी-कर्मचाऱ्यांनी निवडणूक कामाची जबाबदारी चोखपणे पार पाडावी-अजय मोरे

ग्रामसेविका लोखंडे मॅडम यांनी निवडणूक प्रक्रियेचे काम पाहिले. तर सरपंच नागेश ओव्हाळ, मावळत्या उपसरपंच कल्पना काकरे, माजी उपसरपंच एकनाथ गाडे, माजी उपसरपंच कुंदा खांदवे, ग्रामपंचायत सदस्या तृप्ती जांभूळकर,रुपाली गायकवाड, रखाबाई भोईर, अमित ओव्हाळ तसेच ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी यांनी त्यांचे आभिनंदन केले. नवनिर्वाचित ग्रामपंचायत उपसरपंच स्नेहल प्रशांत ओव्हाळ यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.