Maval News : ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत जांभूळ गावात विविध स्पर्धांचे आयोजन

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील जांभूळ गावात ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध, रांगोळी, वकृत्व, कविता लेखन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. प्लॅस्टिकमुक्त, कचरा विभाजन, जलसंवर्धन, स्वच्छता आदी विषयांवर प्रभात फेरीतून जनजागृती करण्यात आली.

प्लॅस्टिक पिशवी वापरु नका, त्या ऐवजी कापडी पिशवीचा वापर करा हि काळाची गरज असून झाडे लावा झाडे जगवा, ओला व सुका, कचरा वेगळा करा, व आपला परिसर स्वच्छ ठेवा, जलसंवर्धन पाणी आडवा पाणी जिरवा, शौचालयाचे महत्त्व, स्वच्छतेचे महत्त्व याबाबत गावांमध्ये शाळेतील मुलांनी व ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच,सर्व सदस्य व सर्व शिक्षक वृंद, ग्रामस्थ यांनी प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली.

गावातील भिंतीवर स्वच्छता व पर्यावरण विषयी घोषवाक्य रंगवण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या या कार्यक्रमासाठी मावळ तालुक्याच्या सभापती ज्योती शिंदे उपस्थित होत्या व त्यांच्या हस्ते कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या.

या कार्यक्रमासाठी लोकनियुक्त सरपंच नागेश ओव्हाळ, उपसरपंच एकनाथ गाडे, सदस्य संतोष जांभुळकर, कुंदा खांदवे, अमित ओव्हाळ, कल्पना काकरे, तृप्ती जांभुळकर, स्नेहल ओव्हाळ, रुपाली गायकवाड, रखाबाई भोईर, ग्रामसेविका कल्याणी लोखंडे, व मुख्याध्यापिका संगीता जगताप, व सर्व शिक्षक वृंद व ग्रामपंचायतीमधील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.