Jamie presents Farah khan’s mimicry : काय ही फराहखान आहे? नाही, बघा बरं कोण आहे ते…

Is this Farah Khan? No, look who it is जॉनी लिव्हर यांनी अंगभूत गुणांच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले त्यांची मुलगी जेमी लिव्हर देखील या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवत आहे.

एमपीसी न्यूज – स्टँड अप कॉमेडी हा कॉमेडीचा एक भन्नाट प्रकार आहे. मनोरंजन क्षेत्राने अनेक स्टँड अप कॉमेडियन दिले आहेत. त्यातील एक नाव म्हणजे जॉनी लिव्हर. एका अत्यंत सामान्य घरातून आलेल्या जॉनी यांनी अंगभूत गुणांच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले. आता त्यांची मुलगी जेमी लिव्हर देखील या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवत आहे.

नुकताच तिने बॉलिवूड दिग्दर्शिका फराह खानची मिमिक्री केलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात जेमी अगदी हुबेहूब फराहच्या आवाजात वेगवेगळ्या स्टार्सना डान्स स्टेप शिकवत आहे. हा व्हिडिओ नुसता ऐकला तर फराहच बोलते असंच वाटेल. अगदी फराहच्या बोलण्याची स्टाईल जेमीने परफेक्टली या व्हिडिओत आणली आहे.

खरंतर जेमीने उच्चशिक्षण घेतलेले असून तिने काही वर्षे नामांकित कंपनीत नोकरीदेखील केली आहे. पण कॉमेडी जणूकाही तिच्या रक्तातच भिनली आहे असे तिच्या विविध व्हिडिओंमधून जाणवते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.