Jammu-Kashmir: कुलगाममध्ये सुरक्षा दलाबरोबर चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu-Kashmir: Clashes with security forces in Kulgam, three terrorists killed परिसरातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन सुरक्षादलाकडून करण्यात आले आहे.

एमपीसी न्यूज- जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे सुरक्षादलाने शुक्रवारी पुन्हा एकदा दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. दहशतवादी आणि सुरक्षादलांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. अजूनही दोन्ही बाजूने गोळीबार सुरु असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या परिसरात आणखी दहशतवादी लपून बसल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडे मोठा शस्त्रसाठा आढळून आला आहे.

काही दहशतवादी कुलगाममधील नागनद चिमर परिसरात लपून बसल्याची माहिती सुरक्षादलाला मिळाली होती. सुरक्षादलाने चहुबाजूंनी परिसराला घेराव घातला आणि दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

सुरक्षादलाच्या इशाऱ्यानंतरही दहशतवाद्यांनी शरणागती पत्करली नाही आणि सुरक्षादलाच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. सुरक्षादलाने दिलेल्या प्रत्युत्तरात काही वेळातच तीन दहशतवादी मारले गेले.

अजूनही चकमक सुरु असल्याचे सांगण्यात येते. अद्यापही त्या ठिकाणी आणखी दहशतवादी असल्याचे दिसून येत आहे. परिसरातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन सुरक्षादलाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.