Terrorist attack: दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला, दोन दहशतवाद्यांचा खात्मा, 3 जवान शहीद

एमपीसी न्यूज: जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवादी राजौरीतील लष्कराच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न करत होते.(Terrorist attack) यावेळी लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या चकमकीत भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 

जम्मू झोनचे एडीजीपी मुकेश सिंह म्हणाले, “राजौरीतील परगल, दारहाल भागातील लष्कराच्या छावणीचे कुंपण ओलांडण्याचा कोणीतरी प्रयत्न केला, त्यावेळी दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला. दारहाळ पोलिस ठाण्यापासून सहा किलोमीटर अंतरापर्यंत अतिरिक्त पथके पाठवण्यात आली आहेत. यात दोन दहशतवादी ठार झाले असून लष्कराचे दोन जवान जखमी झाले आहेत.

MPC News Podcast 11 August 2022: ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

स्वातंत्र्य दिनापूर्वी देशाला हादरवण्यासाठी दहशतवादी संघटना सतत एखादी मोठी घटना घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र गुप्तचर यंत्रणा सतर्क आहेत आणि भारतीय सुरक्षा दल दहशतवाद्यांच्या नापाक मनसुब्यांना ठामपणे हाणून पाडत आहेत. राजौरी येथील लष्कराच्या छावणीत दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उरी हल्ल्याची आठवण करून देणारा आहे.(Terrorist attack) त्याच धर्तीवर 18 सप्टेंबर 2016 रोजी जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळील भारतीय लष्कराच्या छावणीत घुसून दहशतवाद्यांनी झोपलेल्या भारतीय जवानांवर हल्ला केला होता. झोपलेल्या जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला, ज्यात लष्कराचे 16 जवान शहीद झाले. त्याचवेळी लष्कराच्या कारवाईत चार दहशतवादी मारले गेले. 20 वर्षांतील भारतीय लष्करावरील हा सर्वात मोठा हल्ला होता.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.