Jammu Kashmir : पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड गाजी रशीद ठार

एमपीसी न्यूज- जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये जैश-ए-मोहम्मदचा कमांडर आणि पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड गाजी रशीद ठार झाला. तर या हल्ल्याच्या कटामध्ये सहभागी असलेला कामरान हा देखील या चकमकीमध्ये ढेर झाला. ज्या इमारतीत दहशतवादी लपले होते, ती इमारतही सुरक्षादलाच्या जवानांनी स्फोट करत उद्ध्वस्त केली.

दरम्यान, पुलवामा जिल्ह्यातील पुंगलान भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच मध्यरात्रीनंतर सुरक्षादलांनी परिसराला घेरले. पहाटे झालेल्या चकमकीत 55 राष्ट्रीय रायफलच्या मेजरसह 4 जवान शहीद झाले. चकमकीदरम्यान एका नागरिकाचाही मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.