Pimpri : दारूमुक्त समाजासाठी रविवारी जनजागरण सभा 

एमपीसी न्यूज –  मद्यपींना दारूमुक्त करण्याचे काम करणाऱ्या अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने रविवारी (दि. २)  आकुर्डीतील श्रमशक्ती भवनमध्ये सायंकाळी ५ ते ७ या दरम्यान जनजागृती सभेचे आयोजन केले आहे, अशी माहिती आयोजकांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

दिवसेंदिवस मद्यपींचे प्रमाण वाढतच आहे. या दारूच्या आहारी गेलेल्या दोन अमेरिकन नागरिकांनी १९३५ साली या संस्थेची स्थापना केली. दारूमुक्तीसाठी आज ही संस्था १८३ देशात काम करीत आहे. विशेषतः जे दारूच्या आहारी गेलेले असतात ते दारुमुक्त होतात आणि इतरांना दारू पिण्यापासून परावृत्त करून समाज व संस्थाप्रती एक कृतज्ञतेने काम करतात. मुंबईत मुख्य कार्यालय असून महाराष्ट्रभर शाखा कार्यरत आहे. दारूच्या आहारी गेलेला दारुड्या हा दारुला सर्वस्वी समजतो. त्याच्याकडे नकारात्मकता जास्त प्रमाणात असते. दारू पिणे हा एक मद्यपाश आजार असल्याचे अमेरिकन डॉक्टर असोसिएशनने सिद्ध केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

या संस्थेच्या माध्यमातून लाखो मद्यपी व्यसनमुक्त झाले. घटस्फोटित एकत्र येऊन सुखाने संसार करीत आहे. दारुड्याच्या सहवासात असल्याने हैराण झालेल्या पत्नीसाठी देखील ही संस्था समुपदेशन करते.

दारूमुक्तीसाठी १२ प्रकारच्या नियमावली बनविण्यात आलेली आहे. त्या नियमावलीचे पालन केल्यास दारूमुक्त होऊ शकतो. या चळवळीत कोणतेही शुल्क आकारले जात नाही. या सभेत जास्तीत जास्त पीडितांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मकरंद- ७२१८९७६४७४, अमोल ८८८८१२८८८३ यांना संपर्क साधा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.