Pimpri : इस्कॉनतर्फे सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव 

एमपीसी न्यूज – इस्कॉनच्या वतीने येत्या सोमवारी (दि.3) श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

रावेत येथील श्री श्री गोविंद धाम (इस्कॉन) मंदिरात सोमवारी सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाला सातारा, कराड, कोल्हापूर, मंचर, नारायणगाव, यासह विविध भागातील भाविक उपस्थित राहणार आहेत.

भाविकांसाठी सोमवारी दिवसभर दर्शन चालू राहणार आहे. संध्याकाळी सात वाजता भजन, आठ ते अकरा राधाकृष्णांचा अभिषेक, रात्री बारा वाजता महाआरती केली जाणार आहे. भाविकांसाठी महाप्रसादाची सोय केली आहे. जन्माष्टमी सोहळ्यात प्लास्टिकचा वापर केला जाणार नाही. कार्यक्रमाचे फलक कापडी बनविले आहेत. मंडपामध्ये ग्रंथ प्रदर्शन आहे. धार्मिक पूजा विधीची सामुग्री उपलब्ध असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.