Pune : जनसेवा बॅंकेचा सेवक वेतन करार संपन्न

एमपीसी न्यूज – जनसेवा सहकारी बॅंक व पुणे व जनसेवा बॅंक कर्मचारी कल्याण संघटना यांच्यामध्ये 2018 – 2021 या  कालावधीसाठी सेवक वेतन करार संपन्न झाला. 

यावेळी जनसेवा बॅंकेचे अध्यक्ष सीए प्रदीप जगताप, राजेंद्र हिरेमठ, अॅड. सतीश गोरडे, सचिन यादव, गणेश कचरे, सूर्यकांत शिर्के, विनायक गायकवाड, पांडुरंग गायकवाड, राजेंद्र वालेकर, रवी तुपे, संदीप सारडा, आशा बहिरट, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक जोशी, सरव्यवस्थापक किशोर घोळवा, जनसेवा बॅंक कर्मचारी कल्याण संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास खळदकर, सेवक संचालक जितेंद्र दाभाडे, रवींद्र देवकर, दधिची पुंडे आदी उपस्थित होते. सेवक वेतन करारामध्ये सेवकांना विविध प्रकाराच्या कमी व्याजदरातील कर्जयोजना, विविध सेवा, सुविधांचा लाभ होणार आहे.

शिपाई ते अकौटंट या श्रेणीतील सेवकांचा समावेश असून, या वेतनकरारामुळे भरघोस  पगारवाढ होणार आहे. यामुळे सेवकांच्या आवश्यक गरजा पूर्ण होणार असून सध्याच्या महागाईच्या काळात जीवनमान उंचावण्यास यांचा नक्कीत चांगला उपयोग होणार आहे. बॅंकेतील एकूण 368 कायम सेवकांना लाभ होणार आहे. त्यामुळे सेवकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. जनसेवा बॅंकेच्या एकूण 30 शाखा असून बॅंकेच्या एकूण ठेवी दोन हजार कोटी, कर्जे 1129 रुपयांच्यापुढे असून एकूण व्यवसाय 3129 कोटी झालेला आहे. यावर्षी बॅंकेला 12 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. भविष्यात बॅंक नवीन शाखा सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कार्यक्रमाचे आभार समीर कारकीकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.